• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुका तेली समाज संघातर्फे ‘तेली प्रीमियर लीग’ संपन्न  

by Manoj Bavdhankar
May 14, 2024
in Guhagar
92 1
0
Teli Premier League
180
SHARES
514
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण इलेव्हन संघ विजेता तर कालिकामाता धोपावे संघ उपविजेता

गुहागर, ता. 14 : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने दिनांक ११ व १२ मे रोजी पोलीस परेड ग्राउंड, गुहागर येथे ‘तेली प्रिमीअर लीग २०२४’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील एकूण दहा संघांनी व १५४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. Teli Premier League

तेली समाजातील क्रिकेट खेळाडुंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारुपाला यावे तसेच क्रिकेट स्पर्धेतील नवीन प्रकाराची ओळख व्हावी या हेतूने व्यावसायिक स्पर्धेप्रमाणे या लीगचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमतः स्पर्धेच्या पंधरा दिवसापूर्वी खेळाडूंची संघ निवड (ऑक्शन) सोहळा ड्रॉ पद्धतीने सिद्धीविनायक रिसॉर्ट, वरवेली – गुहागर येथे पार पडला. त्यानंतर स्पर्धेच्या आठवडाचा कालावधी असताना स्पर्धेतील “तेली चषक व खेळाडूंच्या जर्सीचे अनावरण समारंभ” विशाल बोटिंग क्लब, मोडकाआगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. Teli Premier League

स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीचा सामना स्मरणिका वॉरीअर्स अडूर विरुद्ध चिपळूण इलेव्हन यांच्या मध्ये झालेल्या सामन्यात सांघिक खेळाच्या जोरावर चिपळूण इलेव्हन संघाने बाजी मारली. तसेच दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना कालिकामाता धोपावे संघांने कै.संदेश इलेव्हन संघ पाथर्डी यांच्यावर मात करीत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम फेरीत झालेल्या चिपळूण इलेव्हन विरुद्ध कालिकामाता धोपावे संघा दरम्यान शेवटच्या चेंडू पर्यंत रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. चार षटकामध्ये ५१ धावांचे अशक्य उदिष्ट ठेवून मैदानात उतरलेल्या चिपळूण इलेव्हन संघांच्या अक्षय करळकरच्या आक्रमक फलंदाजीने धावसंख्या नियंत्रणात ठेवण्यास यश मिळाले. मात्र मोक्याच्या क्षणी झटपट दोन विकेट गमावल्याने सामना कालिकामाता धोपावे संघाकडे झुकताना दिसत होता. परंतु शेवटच्या दोन चेंडूवर चिपळूण इलेव्हन संघाच्या संतोष करळकरने केलेल्या स्फोटक फलंदाजीने ‘तेली प्रिमीअर लीग २०२४’ या चषकावर मोहोर उमटविली. यावेळी स्पर्धेतील धोपावे संघाचा सौरभ पवार याला मालिकावीर घोषित करण्यात आले तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय करळकर, उत्कृष्ट गोलंदाज विनायक जाधव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरज रहाटे व अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून संतोष करळकर यांना गौरविण्यात आले. Teli Premier League

या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी, सौ.जयश्री वैरागी, माजी आमदार विनय नातू, भाजपाचे ओबीसी सेल मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, शिवसेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, युवा उद्योजक व गोल्डन मॅन वैभव दादा रहाटे, कोकण विभागीय सचिव चंद्रकांत झगडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, दिनेश नाचणकर, दत्ताशेठ रहाटे, चिपळूण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण (बापू) राऊत, कोकण विभागीय महिला अध्यक्ष प्रियंका भोपाळकर, महिला जिल्हाध्यक्ष श्रेयाताई महाडिक, गुहागर महिला तालुकाध्यक्ष दिव्या किर्वे, उद्योजक महेश राऊत, गोवर्धन महाडीक, गुहागर तालुकाध्यक्ष प्रकाश झगडे व सर्व आजी माजी पदाधिकारी व समस्त ज्ञाती बांधव यावेळी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवक कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली.  Teli Premier League

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTeli Premier LeagueUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.