उपनिरीक्षक प्रमोद झगडे, यशस्वी होण्यासाठी शहाणपण महत्त्वाचे
गुहागर, ता. 02: तेली समाजातील तरुण तरुणींना समाजातील जोडीदार शोधता यावा म्हणून गुहागर तालुक तेली समाज सेवा संघाने तेली जोडीदार डॉट कॉम नावाने संकेतस्थळ सुरु केले आहे. या संकेतस्थळाच्या सादरीकरण नुकतेच चिपळूण येथील मेळाव्यात झाले. त्यावेळी मेळाव्याचे प्रमुख अतिथी दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद झगडे यांनी हे संकतस्थळ बनविताना डेटाबेस सुरक्षित राहील याची काळजी घेतल्याबद्दल गुहागर तेली समाजाचे कौतूक केले. Teli Jodidar.com secure website
चिपळूण येथे चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघ व महिला आघाडी यांच्या वतीने गुणगौरव सोहळा व स्नेहमेळावा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद झगडे होते. त्यांच्या हस्ते समाजातील गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ यांनी तयार केलेल्या तेली जोडीदार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या प्राथमिक माहितीचे उपस्थितांसमोर सादरीकरण करण्यात आले. या संकेतस्थळाचे प्रास्ताविक गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचे सचिव व वेबसाईट समन्वयक प्रविण रहाटे यांनी केले. तसेच सादरीकरण वेबसाईट तंत्रज्ञ प्रमुख विलास किर्वे यांनी केले. Teli Jodidar.com secure website
यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद झगडे म्हणाले की, गुहागर तेली समाज सेवा संघाने तयार केलेले संकेतस्थळावरील डेटाबेसच्या सुरक्षिततेचे काम उत्तम आहे. समाजातील तरुण तरुणींची वैयक्तिक माहिती या संकेतस्थळावरुन कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे या संकेतस्थळाचा वापर समाजाने करावा. आज स्पर्धेचे, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात केवळ गुणवत्तेने हुशार राहुन चालणार नाही. यशस्वी होण्यासाठी शिक्षणातून येणारे शहाणपण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे, कोणत्या क्षेत्राची त्याला आवड आहे. याचा विचार पालकांनी करावा आणि पाल्याच्या आवडीनुसार त्यामध्ये अधिक शिक्षण घेण्याची, करीअरची संधी त्याला द्यावी. Teli Jodidar.com secure website
या कार्यक्रमास दापोली पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद झगडे, कोकण विभागीय सचिव व रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे संचालक चंद्रकांत झगडे, महिला कोकण विभागीय अध्यक्षा प्रियंका भोपाळकर, रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार, रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ महिला अध्यक्ष श्रेया महाडिक, ज्येष्ठ साहित्यिक व कवी अरुण इंगवले, माजी जि.प. बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे, सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.नागेश वाघमारे, महावितरण कंपनीच्या शाखा अभियंता प्रवीण राऊत, चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण (बापू) राऊत, तालुका महिला आघाडी अध्यक्षा स्वाती महाडिक, गुहागर तालुका तेली समाज सेवा संघांची बेसिक, महिला व युवक कार्यकारिणी यावेळी उपस्थित होती. Teli Jodidar.com secure website