गुहागर, ता. 08 : अंजनवेल प्रतिनिधी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पेवे उर्दू येथे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अध्ययन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. Teacher’s Day at Peve Urdu School
कार्यक्रमाची सुरवात उजेर खान यांच्या कुराण पठणाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक शकील अहमद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रस्ताविक पदवीधर शिक्षक अशफाक कुपे यांनी केले. यावेळी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित पदवीधर शिक्षक अशफाक कुपे व विद्यार्थ्यांमध्ये कशफ खान, अदियान खान, जैनब शब्बीर व जोहेब निसार ने उर्दूमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. एक दिवसाचे शिक्षक व जर खान यांनी इंग्लिश मध्ये सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्ण न यांच्या जीवनावर आधारित आपले विचार मांडले. तेरे उर्दू हायस्कूलचे लुकमान तडवी हे या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष शकील अहमद यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. Teacher’s Day at Peve Urdu School