गुहागर, ता. 06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी सदस्य यांच्या उपस्थितीत गुहागर एज्युकेशन सो. गोपाळकृष्ण मा.वि. मंदिर गुहागर हायस्कूल येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. Teacher’s Day at Guhagar High School


भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस व त्यांची शिक्षण क्षेत्रातील अमूल्य कामगिरी तसेच त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे आणि शिक्षकांचा सन्मान व्हावा म्हणून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ सिटी गुहागरचे चार्टर प्रेसिडेंट शामकांत खातू, सेक्रेटरी मनिष खरे, आशुतोष सर, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे व शिक्षक, शिक्षिका वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गंगावणे सर यांनी केले. तर राधा शिंदे मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले. Teacher’s Day at Guhagar High School