रत्नागिरी, ता. 15 : रा. भा. शिर्के प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक, रा. स्व. संघाचे माजी रत्नागिरी नगर संघचालक मनोहर शंकर पंडित (वय ८७) यांचे १२ एप्रिल रोजी १२:३० वाजता निधन झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक व साधी राहणी असलेले पंडित सर गेल्यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले. चर्मालय अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सीए आनंद पंडित, सून, नातू असा परिवार आहे. Teacher Manohar Pandit is No More
मनोहर पंडित यांचा जन्म ३० जून १९३८ साली रत्नागिरी येथे झाला. इयत्ता सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण दामले विद्यालयात झाले. इयत्ता आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण पहिल्या पाच क्रमांकामध्ये राहून, १९५६ साली पूर्ण केले. गोगटे कॉलेजमध्ये येथे पूर्ण करून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून १९६० साली बीए झाले. आर्थिक परिस्थितीमुळे कॉलेज शिक्षण अर्धवेळ नोकरीं करून पूर्ण केले. Teacher Manohar Pandit is No More


पुढे १९६१ ते १९६५ पोर्ट ऑफिसमध्ये नोकरी केली. १ मार्च १९६५ पासून रा. भा. शिर्के हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९९१ पर्यंत सहाय्यक शिक्षक आणि त्यानंतर ३० जून १९९६ रोजी निवृत्त होईपर्यंत पर्यवेक्षक म्हणून काम केले. या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत शाळेमध्ये २१ वर्षे एनसीसी ऑफिसर म्हणून काम केले. त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलानामध्ये सहभागी होण्याचा मान मिळवला. शाळेमध्ये सांस्कृतिक विभाग व विद्यार्थी ग्राहक भांडार विभाग त्यांनी अनेक वर्ष सांभाळला. Teacher Manohar Pandit is No More
निवृत्त जीवनात सामाजिक कामात व्यस्त असताना अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे रत्नागिरी नगर संघचालक म्हणून दायित्व पार पडले. शेवटपर्यंत त्यांनी टिकवलेली साधी रहाणी व शारीरिक तंदुरुस्ती सर्वांच्या कौतुकाचा विषय होती. त्यांच्या निधनाने अनेकांनी शोक व्यक्त केला. (कै.) मनोहर शंकर पंडित यांचा दशक्रिया विधी सोमवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता पांढरा समुद्र येथे होईल. बारावा व तेरावा दिवस २३ एप्रिल रोजी होणार आहे. Teacher Manohar Pandit is No More