• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिवेली फाटा येथे चाकरमान्यांसाठी चहा नाश्ता

by Guhagar News
September 5, 2024
in Ratnagiri
97 1
0
Tea breakfast for servants at Chiveli Phata
191
SHARES
547
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा गुहागर विधानसभेच्या वतीने वाटप

गुहागर ता. 05 : गणेश उत्सवासाठी मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावाला येतात. काही एसटी महामंडळाच्या गाडी तून तर काही खाजगी गाड्या करून येत असतात. अशावेळी वाहतूक कोंडीमुळे त्यांना खूप तासांचा प्रवास करावा लागतो. यासाठीच भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभेच्या आणि माजी आ. डॉ विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ५ ते ७ सप्टेंबर पर्यंत चिवेली फाटा घोणसरे येथे सर्व चाकरमानी व प्रवाशांसाठी चहा नाष्टा वाटप दिवस रात्र करण्यात येणार आहे. Tea breakfast for servants at Chiveli Phata

कोकणात गणेशोत्सवाला बहुसंख्य चाकरमानी आपापल्या गावी येतात. त्यामुळे एरवी सामसूम असलेली गावे माणसांनी भरून जातात. मात्र गणेश चतुर्थीच्या आधी दोन दिवस खूपच वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आठ तासा ऐवजी 12 ते 15 तास सुद्धा प्रवास करून आपल्या गावी पोहोचावे लागते. यादरम्यान त्यांना पाणी किंवा इतर गोष्टींची उपलब्ध होणे गरजेचे असते. हा सेवाभावी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून चिपळूण गुहागर मार्गावरील चिवेलीफाटा घोणसरी येथे भाजपा कार्यकर्ते स्वतः चाकरमान्यांसाठी दिनांक ५ ते ७ सप्टेंबर पर्यंत दिवस रात्र चहा नाश्ता वाटप करणार आहेत. Tea breakfast for servants at Chiveli Phata

खास भाजपा गुहागर विधानसभेच्या माध्यमांतून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. जेणेकरून गावाकडे येणाऱ्या चाकरमानी यांना या ठिकाणी थोडा विसावा मिळवा आणि चहा नाष्टा याचा स्वाद घेता यावा यासाठी भाजपाने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा चाकरमान्यांनी लाभ घ्यावा, असे भाजपा गुहागर विधानसभेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. Tea breakfast for servants at Chiveli Phata

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTea breakfast for servants at Chiveli PhataUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.