मालमत्ता करातून 56 लाखाची करवसुली
गुहागर, ता. 10 : गुहागर नगरपंचायतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षात 56 लाख 22 हजार 938 रुपये इतकी कर वसुली केली आहे. वर्षअखेरीस थकबाकी अत्यल्प असल्याने नगरपंचायत प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. नगरपंचायतीने शहरामध्ये पथदीप, दररोजची स्वच्छता, पाणी पुरवठा नियमित ठेवण्यासाठी येणारी देखभाल दुरुस्ती यामुळे जास्तीत जास्त कर वसुलीचे धोरण आखले आहे. अजूनही नगरपंचायतीची सक्षम पाणी योजना झालेली नाही. मोडकाघर धरणामुळे शहराला मुबलक पाणी पुरवठा मिळत आहे. Tax collection of Guhagar Nagar Panchayat


नगरपंचायतीची मागील आर्थिक वर्षातील घरपट्टी वसुली 96 टक्के झाली आहे. यामध्ये मालमत्ता कर, वीज कर व इतर कर धरुन 34 लाख 83 हजार 228 करापैकी 33 लाख 27 हजार 918 रुपये वसुली झाली आहे. पाणी पट्टी कराची रक्कम मात्र घरपट्टीपेक्षा 1 टक्क्याने कमी होऊन 95 टक्के झाली आहे. यामध्ये 24 लाख 23 हजार 805 पाणीपट्टीपैकी 22 लाख 95 हजार 20 रुपये वसुली झाली आहे. गुहागर नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी यांनी गेले महिनाभर घेतलेल्या प्रयत्नांमुळे समाधानकारक वसुली झाली असल्याने मुख्याधिकारी सचिन चव्हाण यांनी सांगतानाच सर्व कर्मचारी, अधिकारीवर्गाचे कौतुक केले आहे. Tax collection of Guhagar Nagar Panchayat
गुहागर नगरपंचायतीची कराची वसुली चांगली झाली असताना शहरवासियांकडून त्याप्रमाणे सेवा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केवळ शहर बाजारपेठेची दररोजची स्वच्छता होते. गेले 10 दिवस समुद्रचौपाटीचीही स्वच्छता झालेली नाही, नगरपंचायतीकडून डास निमुर्तनासाठी गेल्या दोन वर्षात कोणतीही उपाययोजना केलेली नाही. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे याचा सर्वाधिक प्रार्दुभाव आहे. जर चांगल्या पद्धतीने कर वसुली असेल तर नगरपंचायत याकडे लक्ष देईल का? असा सवाल शहरवासियांतून उपस्थित करण्यात येत आहे. Tax collection of Guhagar Nagar Panchayat