गुहागर, ता. 05 : सन 2021 मध्ये तवसाळ तांबडवाडी, बाबरवाडी एस् टी सेवा सुरू करण्यात आली होती. परंतू जून जुलै 2024 मध्ये खुप पाऊस पडल्याने ही बस सेवा बंद झाली. हि सेवा पूर्ववत होण्यासाठी काताळे, तवसाळ ग्राम पंचायत सदस्या माजी सरपंच सौ.नम्रता निवाते यांनी पाठपुरावा सुरू केला. पण उपयोग झाला नाही नंतर तवसाळ तांबडवाडी बाबरवाडी मधील ग्रामस्थ महिला युवक यांनी मोर्चा घेऊन डायरेक्ट गुहागर बस आगर भेट दिली. निवेदन देण्यात आले. गुहागर डेपो व्यवस्थापन त्यांनी सांगितले की, वळणे रुंदीकरण केल्या शिवाय आम्ही ST. सेवा चालू करणार नाही. Tavasal Tambadwadi ST service started
त्यानंतर सर्व ग्रामस्थ महिला युवा गुहागर विधानसभा मतदारसंघ मा. आमदार श्री भास्कर शेठ जाधव यांची तातडीने भेट घेतली. सोबत सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते श्री विजय जी मोहिते यांनी ही भेट घडवून आणली. सा. बांधकाम उप विभाग गुहागर संबंधित अधिकारी यांना लागलीच निर्देश दिले कि, रोहिले तवसाळ तांबडवाडी, बाबरवाडी रस्त्याची वळणे रुंदीकरणासाठी पहाणी करावी व रस्ता S.T. वाहतुकीसाठी सुरू करावा. त्यानूसार तवसाळ गावचे सुपुत्र, Civil engineering कॉन्ट्रॅक्टर श्री अमोल पाटील यांना काम देण्यात आले. त्यानूसार चांगले काम करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. आणि ST सेवा पूर्ववत सुरू झाली. Tavasal Tambadwadi ST service started