गुहागर, ता. 14 : जिल्हा परिषद रत्नागिरी प्राथमिक शिक्षण विभागाच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा सन २०२३ – २४ या शाळा काताळे नंबर १ येथे शिस्तबद्ध पद्धतीने नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने अनेक बक्षिसे मिळविली. Tavasal Tambadwadi School’s success in sports competition
![Tavasal Tambadwadi School's success in sports competition](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/01/gn1213-1.jpg)
![Tavasal Tambadwadi School's success in sports competition](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/01/gn1213-1.jpg)
या क्रिडा स्पर्धांमध्ये आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीनेअनेक बक्षिसांबरोबर विजेता आणि उप विजेता बक्षिसे मिळविली. यामध्ये सांघिक स्पर्धा बक्षिसे मुली – मोठा गट विजेता ( कब्बडी ) व ( लंगडी ) मुली – लहान गट विजेता ( खो-खो ) मुली – मोठा गट उप विजेता ( खो-खो ) मुले – लहान गट विजेता ( कब्बडी ) वैयक्तिक स्पर्धा हर्ष निवाते – लांब उडी व उंच उडी ( प्रथम क्रमांक ) अनुष्का घाणेकर – मुली, उंच उडी ( प्रथम क्रमांक ) या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेय क्रिडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले. याबाबत तवसाळ तांबडवाडी च्या वतीने अभिनंदन करण्यात आले. Tavasal Tambadwadi School’s success in sports competition
![Tavasal Tambadwadi School's success in sports competition](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/01/gn1214.jpg)
![Tavasal Tambadwadi School's success in sports competition](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/01/gn1214.jpg)
![Tavasal Tambadwadi School's success in sports competition](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/01/gn1212-1.jpg)
![Tavasal Tambadwadi School's success in sports competition](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/01/gn1212-1.jpg)