गुहागर, ता. 01 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई देवी, श्री सोनसाखळी देवी, श्री देव रवळनाथ, श्री त्रिमुखी देवी, श्री सोमजाई देवी या गावदेवी देवांचा शिमगोत्सव संपन्न झाला. यावेळी गावातील 12 होमाला रात्री 12 वाजता होमाला आग लावली जाते. Tavasal Shimgotsav
रविवार दि. 24 रोजी रात्री उशिरा देवांना रुपे लाऊन देवांची रूपे पालखीत विराजमान करतात. सोमवार दि. 25 रोजी पालखी मंदिरातून हळदी कुंकवासाठी तवसाळ गावी नेण्यात येते. तेथे देवीची घरोघरी खणा नारळलांनी ओठी भरली जाते. मंगळवार दि. 26 रोजी देवीची पालखी फेरी बोट मधून जयगड खाडी येथे नारळ अर्पन करण्याचा समुद्रामध्ये घेऊन जातात. अशी (अख्यायिका ) आहे, की देवी आपल्या बहीनीला भेटायला जाते. त्यानंतर पालखी होमावर येते व होम पेटवला जातो. यावेळी तवसाळ ग्रामस्थ मंडळाचा तमाशा होतो. येथे खास पालखी नाचविण्याचा कार्यक्रम असतो. त्यानेतर पालखी तवसाळ आगर होमावर जाऊन सहानेवर विराजमान होते. Tavasal Shimgotsav
यावेळी श्री महामाई सोनसाखळी देवीचे मानकरी श्री राजेश रमेश गडदे, खोत श्री मोहन यशवंत गडदे, तवसाळ, खोत संतोष वामन सुर्वे, पडवे, मानकरी श्री दिलीप येद्रे, गोपाळ येद्रे, भगवे निशाण मानकरी बबन कुरटे, सोन्या कुरटे, मंदिर ट्रस्ट सदस्य, विजय मोहिते, नवनित पाटिल, चंद्रकांत निवाते, ,ग्रामस्थ निलेश सुर्वे, प्रदिप सुर्वे, विजय शिवलकर, बापु गडदे, शशांक सुर्वे, विलास गडदे, अनंत घाणेकर, प्रदिप निवाते, मोहन घाणेकर, रमेश कुरटे, देवजी वाघे, विजय नाचरे, अमोल पाटील, उमेश भाटकर, दिपक भाटकर, दिलेश सुर्वे, विजय येद्रे, गणेश निवाते, हिरेश हुमणे, शंकर येद्रे, नारायण येद्रे, सुमेध सुर्वे, मुरलीधर गडदे आणि वरिष्ठ सर्व चतुरशिमा मधिल ग्रामस्थ उपस्थित होते. Tavasal Shimgotsav