• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पक्ष बांधणीसाठी तटकरे आज गुहागरात

by Ganesh Dhanawade
January 8, 2024
in Guhagar
115 1
0
Tatkare Guhagar for Party building
226
SHARES
645
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कार्यकर्त्यांना संजीवनी देण्याचा प्रयत्न

गुहागर, ता. 08 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्याने गुहागर विधानसभा मतदार संघातहि शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडले आहेत. गेली अनेक महिने गुहागरात न फिरकलेले खासदार सुनील तटकरे आज ( दि. ८) राष्ट्रवादी फुतीनंतर पक्ष बांधणीसाठी गुहागर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याने गुहागर तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. Tatkare Guhagar for Party building

आज सकाळी १० वाजता अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाच्या हेलिपॅड हेलिकॉप्टरने उतरणार आहेत. त्यानंतर गुहागर बाजारपेठ मधील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाला भेट देणार आहेत. तेथून शासकीय विश्रामगृहात विकासकामांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसेच विकासकामे सुचविणे व जी मंजूर कामे आहेत, ती पूर्ण करणे, मंजूर कामांचे श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू आहेत, यावर देखील चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. Tatkare Guhagar for Party building

गुहागर विधानसभा मतदार संघातून आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत पक्ष बांधणीबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनेक मुद्दांवर चर्चा करुन तालुक्यातील आगामी राजकारणावर चिंतन करण्यात येणार आहे. पक्ष फुटीनंतर तालुक्यातील अनेक पदाधिकारी अजून शरद पवारांच्या गटात असल्याने त्यांना अजित पवार गटात आणण्यासाठी काय केले पाहिजे. तर काही पदाधिकारी अजित पवार गटात सामील होण्यासाठी मुहूर्त बघत असल्याची चर्चा सुरू आहे. शरद पवार गटात असलेल्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आ. भास्कर जाधव यांचे काम करावे लागेल म्हणून तेही अजित पवारांच्या गटात येण्यासाठी कुंपणावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर हे देखील आज खा. तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने मतदार संघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवकची ताकद वाढणार आहे. Tatkare Guhagar for Party building

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTatkare Guhagar for Party buildingUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet57
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.