मास्टर शशिकांत संघ विजेता तर फॉरेव्हर शाहु संघ उपविजेता
गुहागर, ता. 11 : आयपीएलच्या धर्तीवर खेळवल्या गेलेल्या तळवली प्रीमिअर लीग पर्व 3 चा मास्टर शशिकांत संघ विजेता ठरला. तर फॉरेव्हर शाहु संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत एकूण 10 संघमालकांच्या 10 संघांनी सहभाग घेतला होता. Talwali Premier League season 3 concluded
गुहागर तालुक्यातील तळवली चिंचवाडी येथील मैदानावर खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत मनोज आंब्रे यांचा खुशी इलेव्हन, गिरिराज व प्रसाद कारेकर यांचा मास्टर शशिकांत, अमित पोफळे व निमेश किंजळे यांचा स्वयंभू सोमनागेश्वर, नंदकिशोर आग्रे व सुदर्शन सांगळे यांचा धृवांश इलेव्हन, सूरज खोकरे व शैलेश डाकवे यांचा श्री सुकाई देवी क्रिकेट संघ, विशाल सांगळे व रोहन बागकर यांचा फोरेव्हर शाहू, समीर डाकवे व प्रणित बारे यांचा मी तळवलीकर, मंदार बागकर यांचा तिर्थक वोरिअर्स, विनोद पवार व अक्षय आग्रे यांचा किमया इलेव्हन, हितेश आग्रे व आशिष आग्रे यांचा शिवशक्ती आगरवाडी संघ या संघाचा समावेश होता. Talwali Premier League season 3 concluded

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला विविध स्तरातील मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील विजेता मास्टर शशिकांत संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम 13000/- तर फॉरेव्हर शाहु उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम 10000/- देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मालिकाविर म्हणून अभिषेक डावल, उकृष्ट फलंदाज रोहन बागकर, उत्कृष्ट गोलंदाज सनी चव्हाण यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून सुदीप जाधव, समित पवार, विनोद पवार, प्रवीण पवार, आतिष पवार, आदित्य आग्रे, प्रविण पवार, प्रदीप चव्हाण, दीपक पवार यांनी काम पाहिले. Talwali Premier League season 3 concluded
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी सरपंच मयुरी शिगवण, उपसरपंच संतोष जोशी, चंद्रकांत बोटके, टीपीएल पर्वा 3 चे अध्यक्ष विनोद पवार, दत्ताराम शितप, शांताराम शिगवण तसेच गावातील विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन नरेश पवार, ओंकार पिंपळकर, प्रदीप चव्हाण, विशाल डावल यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी तळवली प्रीमिअर लीगच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. सदर स्पर्धा युट्यूब लाईव्ह दाखवण्यासाठी सूचित मालप यांनी मेहनत घेतली. तसेच संपूर्ण स्पर्धेसाठी जेवण व्यवस्था भेळेवाडी महिलांनी अतिशय उत्तमरीत्या केली होती. Talwali Premier League season 3 concluded
