गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अंजनवेल येथील टाळकेश्वर पॉईंट दीपस्तंभ आणि दीपपोत निर्देशालय मुंबई मार्फत दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय व भागेतीबाई सुदाम पाटील जुनियर कॉलेज येथे पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. Tallakeshwar Point Lighthouse
यानिमित्त शाळेमध्ये टाळकेश्वर पॉईंट दीपस्तंभ मार्फत चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रथम तीन क्रमांकास रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधनात किंवा अवकाशाबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना अवकाशाबद्दल रुची निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम करण्यात आला. Tallakeshwar Point Lighthouse
या कार्यक्रमाला टाळकेश्वर पॉइंट दीपस्तंभ नौचालन सहायक ग्रेड १ चे सुलेमान मालपेकर, नौचालन सहायक ग्रेड २ चे कोरो बेसरा, सुरक्षा रक्षक प्रताप शिर्के, फील्ड असिस्टंट निखिल आंबेरकर, फील्ड असिस्टंट सचिन देवळेकर, अंजनवेल विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश गोरीवले व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Tallakeshwar Point Lighthouse