स्वराज्याची घोडदळ, पायदळ, आरमार ही दले म्हणजेच गुप्तहेर खाते
गुहागर, दि. 03 : स्वराज्याच्या गुप्तहेरखात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक (Bahirji Naik) वेषांतर करण्यात पटाईत होते शत्रूच्या गोटात जाऊन अगदी इतंभुत माहिती काढण्यात बहिर्जी नाईक निष्णात होते. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) कोणत्याही मोहिमेवर जाण्याअगोदर त्याठिकाणची सगळी माहिती बहिर्जी नाईक काढत असत. आणि ती माहिती महाराजांपर्यंत पोहोचवत असत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्धे काम सोपे होत असे. Swarajya’s spy “Bahirji Naik”


बहिर्जी नाईकांच्या (Bahirji Naik) मदतीनेच छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अनेक मोहिमांमध्ये यश मिळवले होते. बहुरूपी असलेले आणि नक्कल करणे, वेष बदलण्यात पारंगत असलेले बहिर्जी नाईक यांना त्यांच्या कलेतील कौशल्य पाहूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा गुप्तहेर खात्याचे प्रमुख पद दिले होते. Swarajya’s spy “Bahirji Naik”
बहिर्जी नाईक (Bahirji Naik) हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत अगदी कुठलाही वेषांतर अगदी सहज करत होते. ते विजापूरच्या आदिलशाह आणि दिल्लीचा बादशहा यांच्या महालात देखील वेषांतर करून जात आणि खुद्द आदिलशाह आणि औरंगजेबाकडूनच पक्की माहिती घेऊन येत असत. आपण गुप्तहेर असल्याचा संशय जरी आला तरीही आपली कत्तल होणार हे माहीत असताना देखील बहिर्जी नाईकाना उभ्या आयुष्यात कधीच कोणी पकडू शकले नाही. Swarajya’s spy “Bahirji Naik“


यातच त्यांची बुद्धीमत्ता आणि चातुर्य दिसून येते. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यात जवळपास तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे या सगळ्यांचे नेतृत्व बहिर्जी नाईक करायचे. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर दिल्ली कर्नाटक पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणाऱ्याचा कडेलोट केला जात असे त्यामुळेच हेर खात्याने दिलेली अगदी अचूक आणि बरोबर असे बहिर्जी नाईकांनी गुप्तहेर खात्याची जणू एक भाषाच तयार केली होती. ती फक्त बहिर्जी नाईकांच्या (Bahirji Naik) गुप्तहेरांनाच समजत असे आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) या गुप्तहेर खात्याची भाषा समजू शकत होते. त्यात वाऱ्यांचे आवाज असत कुठलाही संदेश द्यायचा असेल तर त्याच भाषेत दिला जात असे महाराज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी बहिर्जी नाईकांना माहीत असे आणि म्हणूनच महाराज त्याठिकाणी जाण्याआधीच तिथली सगळी खडानखडा माहिती बहिर्जी नाईक काढत आणि महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवत असे. Swarajya’s spy “Bahirji Naik“
असे म्हटले जाते महाराजांच्या दरबारात जर बहिर्जी नाईक (Bahirji Naik) वेषांतर करून आले तर त्यांना फक्त महाराजच ओळखू शकत होते म्हणजे काय तर दरबारात बहिर्जी नाईक कोणी व्यक्ती नाही अशीच सर्वांची समजूत होत असे. बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर उत्तम लढवय्या देखील होते. तलवारबाजी आणि दांडपट्यात ते माहिर होते कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागे. Swarajya’s spy “Bahirji Naik”
यामुळेच बहिर्जी नाईकांना तलवारबाजी आणि दांडपट्टयाच देखील उत्तम ज्ञान होते. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी (Chhatrapati Sambhaji Maharaj) महाराज ज्यावेळी औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त आग्र्याला जाणार होते. त्यावेळी औरंगजेब दगा फटका करणार आहे ही माहिती देखील बहिर्जी नाईक (Bahirji Naik) आणि त्यांच्या गुप्तहेरांनी आधीच शिवरायापर्यंत पोहोचवली होती म्हणूनच आग्राच्या भेटीमध्ये शिवराय आधीच सावध झाले होते. Swarajya’s spy “Bahirji Naik“


छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनेत गुप्तहेर म्हणुन बहिर्जी नाईकांचा सहभाग असायचा. अफजलखानचा वध पन्हाळ्यावरून सुटका शाहिस्तेखानाची बोटे कापणे पुरंदरचा तह सुरतची लूट अशा प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात बहिर्जी नाईक (Bahirji Naik) महाराजांचं अर्ध काम पूर्ण करत असत स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख आणि छत्रपतींचा तिसरा डोळा अशी ज्यांची ओळख होती. Swarajya’s spy “Bahirji Naik”
बहिर्जी नाईकांचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी अनेकांना माहीत नाही. त्याच्या मृत्यू विषयी इतिहासात उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार लढाईत जखमी झालेले बहिर्जी नाईक (Bahirji Naik) सांगली जिल्ह्यातील बानुर गडावर आले. जखमी अवस्थेतच ते काही काळ बाणुर गडावर राहिले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात बानुर गड म्हणजेच भूपाळ गड आहे हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. Swarajya’s spy “Bahirji Naik”


बानुर गडावरती स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक (Bahirji Naik) यांची समाधी आहे. इथेच नाईकांनी अखेरचा श्वास घेतला होता. जोपर्यंत बहिर्जी नाईक जिवंत होते तो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या सोबत कधीही दगाफटका झाला नाही. एक मात्र नक्की जर बहिर्जी नाईक जिवंत असते तर छत्रपती संभाजी महाराज कधीच मुघलांच्या हाती लागले नसते. Swarajya’s spy “Bahirji Naik”
कारण संभाजी महाराज पकडले जाण्यापूर्वीच बहिर्जी नाईकांचा मृत्यू झाला होता. आणि म्हणूनच संगमेश्वरात मोघल संभाजी राजेंना कैद करू शकले. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख आणि छत्रपतींचा तिसरा डोळा अशी ओळख असणाऱ्या बहिर्जी नाईकांच्या शौर्य कर्तुत्व आणि पराक्रमाला कधीच कोणी विसरू शकत नाही. Swarajya’s spy “Bahirji Naik”

