गुहागर, ता. 01 : येथील यश सुरेश मर्दा यांने पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षेत सुयश मिळवले. याबद्दल गुहागर बाजारपेठेतील हनुमान देवस्थान फंड यांच्या वतीने यश मर्दा यांचा सत्कार करण्यात आला. Success of Yash Marda in CA Exam
सीए फाउंडेशन व इंटरमिजीएट व सीए अंतिम पहिल्याच प्रयत्नात यश याने सुयश प्राप्त केले. यश याचे क्लासेस एकत्वम अकादमी पुणे, तर लेखसंग्रह कीर्तने पंडित पुणे येथे केले आहे. यश याचे प्रार्थमिक शिक्षण बालभारती पब्लिक स्कूल अंजनवेल येथे झाले आहे. तर अकरावी व बारावीचे शिक्षण एम एम सी सी पुणे या कॉलेजला झाले आहे. यश याचे वडिलांचे गुहागर बाजारपेठेत येथे बी जी मर्दा यांचे मर्दाज वस्त्रम दुकान आहे. या यशाबद्दल यश मर्दा याचे गुहागर तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे. Success of Yash Marda in CA Exam