गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे पार पडल्या. यात सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वेलदूर नवानगर मराठी शाळेने यश मिळवले. Success of Veldur School in Sports Competition


सांघिक खेळामध्ये कबड्डी मोठा गट मुले व कबड्डी मोठा गट मुली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर कबड्डी लहान गट मुले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर लंगडी या सांघिक प्रकारामध्ये लहान गटांमध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये अर्णव श्रीकांत रोहिलकर याने लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक, मानवी अंकुश शिरगावकर हिने उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक, येवण संतोष नाटेकर याने उंच उडी मध्ये द्वितीय क्रमांक, श्रेया नितेश भोसले हिने धावणे द्वितीय क्रमांक, दक्ष शशिकांत रोहिलकर याने गोळफेक मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.श्री मनोज पाटील, शाळेच्या उपशिक्षिका श्रीम.अंजनी मुद्दमवार, श्रीम. धन्वंतरी मोरे, श्रीम.सुषमा गायकवाड व पदवीधर शिक्षिका श्रीम.अफसाना मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Success of Veldur School in Sports Competition