• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

क्रीडा स्पर्धेमध्ये वेलदूर नवानगर शाळेचे  यश

by Manoj Bavdhankar
December 23, 2024
in Guhagar
82 1
0
Success of Veldur School in Sports Competition
162
SHARES
462
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे पार पडल्या. यात सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वेलदूर नवानगर मराठी शाळेने यश मिळवले. Success of Veldur School in Sports Competition

सांघिक खेळामध्ये कबड्डी मोठा गट मुले व कबड्डी मोठा गट मुली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर कबड्डी लहान गट मुले यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर लंगडी या सांघिक प्रकारामध्ये लहान गटांमध्ये मुलींनी द्वितीय क्रमांक मिळविला. वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये  अर्णव श्रीकांत रोहिलकर याने लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक, मानवी अंकुश शिरगावकर हिने उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक, येवण संतोष नाटेकर याने  उंच उडी मध्ये द्वितीय क्रमांक, श्रेया नितेश भोसले हिने धावणे द्वितीय क्रमांक, दक्ष शशिकांत रोहिलकर याने गोळफेक मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.श्री मनोज पाटील, शाळेच्या उपशिक्षिका श्रीम.अंजनी मुद्दमवार, श्रीम. धन्वंतरी मोरे, श्रीम.सुषमा गायकवाड व पदवीधर शिक्षिका श्रीम.अफसाना मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Success of Veldur School in Sports Competition

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuccess of Veldur School in Sports CompetitionUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.