गुहागर, ता. 07 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज, चिपळूण येथे दि. 3 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत रिगल पंचम 2024 ही नृत्य स्पर्धा तसेच रिगल करंडक 2024 या एकांकिका स्पर्धेमध्ये शृंगारतळीच्या रिगल कॉलेजचे सुयश संपादन केले. Success of Sringaratali College in Regal Trophy
या स्पर्धेमध्ये रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज कणकवली, रिगल कॉलेज चिपळूण, रिगल कॉलेज महाड, रिगल कॉलेज शृंगारतळी, रिगल कॉलेज कल्याण या महाविद्यालयानी सहभाग घेतला होता. या अंतर्गत विविध नृत्याविष्कार तसेच एकांकिका सादर करण्यात आल्या. रिगल करंडक 2024 मध्ये रिगल कॉलेज कणकवलीच्या ‘विठ्ठल’ या एकांकिकेला प्रथम, रिगल कॉलेज, चिपळूणच्या ‘ बंद आहे’ या एकांकिकेला द्वितीय तर रिगल कॉलेज शृंगारतळीच्या ‘ वन क्लिक’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला. तसेच रिगल पंचम 2024 मध्ये रिगल कॉलेज शृंगातळीच्या ‘ ममिता’ या नृत्यास प्रथम, रिगल कॉलेज चिपळूणच्या छबीन या नृत्यास द्वितीय, तर रिगल कॉलेज कणकवलीने तृतीय क्रमांक मिळवला. Success of Sringaratali College in Regal Trophy
यावेळी रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजय शिर्के, संचालिका डॉ. सौ. सुमिता शिर्के, संचालक मंडळ तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. Success of Sringaratali College in Regal Trophy