संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 10 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे ३ रे कोकण प्रांत संमेलन अर्थात ॲग्री व्हीजन २०२५ हे संशोधनात्मक संमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. या संमेलनामध्ये विद्यार्थ्यांसाठी संशोधनात्मक स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले. यामध्ये सुमारे ६१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. Success of Sharadchandraji Pawar College in Agri Vision


अन्न प्रक्रिया व अन्न सुरक्षा या दोन्ही क्षेत्राला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांकडून अन्न प्रक्रिया विषयावर संशोधनात्मक पोस्टर्स, प्रेझेंटेशन व मॉडेल्स इ. सादर करण्यात आले. यामध्ये कु. स्वयम दळी, कुमारी सानिया माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. सुजित पवार , कु.श्रावण कारंडे यांनी द्वितीय व कु.तनिश वर्तक याने तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांकडून ज्वारी पासुन बनवलेले डीलाईटस, काजु च्या बोंडांपासुन पेक्टीन चे उत्पादन व रेजिन उत्पादन असे नाविन्यपूर्ण संशोधन अनुक्रमे सादर करण्यात आले. या सर्व संशोधनांना उपस्थित मान्यवरांची भरपुर दाद मिळाली. Success of Sharadchandraji Pawar College in Agri Vision


सर्व विजयी व सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. कृषि क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया विषयाला अनन्य साधारण महत्त्व असुन याचे पुरेपुर ज्ञान संपादन केल्यास उद्योगशील तरुणांची संख्या वाढेल आणि अन्न प्रक्रीया उद्योगाला चालना मिळेल, असे प्रतिपादन डॉ. सुनितकुमार पाटील यांनी केले व विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयामधील विषय प्राध्यापकांचे योगदान लाभले. या संमेलनासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्रा.सुशांत कदम व प्रा.कैवल्य पटेल यांनी काम पाहीले. Success of Sharadchandraji Pawar College in Agri Vision