• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये पाटपन्हाळे विद्यालयाचे सुयश

by Ganesh Dhanawade
January 11, 2025
in Guhagar
81 0
0
Success of Patpanhale School in Taluk level competitions
158
SHARES
452
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

हस्ताक्षर- शुद्धलेखन तसेच कथाकथन स्पर्धेत विशेष सुयश

गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे कोतळूक हायस्कूलमध्ये गुहागर तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात संपन्न झाली. सदरच्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेतील प्राथमिक गटात कु. कस्तुरी संतोष घाणेकर ७ वी, प्रथम क्रमांक, माध्यमिक गटात कु.समृद्धी सुरेश आंबेकर ९ वी,  प्रथम क्रमांक व उच्च माध्यमिक गटात कु.श्रुती पंढरीनाथ धामणस्कर १२ वी, वाणिज्य विभाग, प्रथम क्रमांक संपादन करून तालुकास्तरीय सुयश संपादन केले आहे. Success of Patpanhale School in Taluk level competitions

तसेच गुहागर तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा तळवली हायस्कूलमध्ये नुकतीच संपन्न झाली. सदरच्या कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात कु.कस्तुरी समीर वझे इ.७ वी हिने तृतीय क्रमांक, माध्यमिक गटात मृण्मयी दत्ताराम जाधव इ.९वी हिने प्रथम क्रमांक व उच्च माध्यमिक गटात पियुषा शैलेश गुरव हिने द्वितीय क्रमांक संपादन केला. हस्ताक्षर व शुद्धलेखन तसेच कथाकथन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले आहे. Success of Patpanhale School in Taluk level competitions

हस्ताक्षर व शुद्धलेखन तसेच कथाकथन स्पर्धेतील सुयशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक चषक व प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा तसेच कथाकथन स्पर्धेतील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, पर्यवेक्षक जी.डी.नेरले व प्राध्यापक- शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Success of Patpanhale School in Taluk level competitions

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuccess of Patpanhale School in Taluk level competitionsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet40
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.