हस्ताक्षर- शुद्धलेखन तसेच कथाकथन स्पर्धेत विशेष सुयश
गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे कोतळूक हायस्कूलमध्ये गुहागर तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात संपन्न झाली. सदरच्या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेतील प्राथमिक गटात कु. कस्तुरी संतोष घाणेकर ७ वी, प्रथम क्रमांक, माध्यमिक गटात कु.समृद्धी सुरेश आंबेकर ९ वी, प्रथम क्रमांक व उच्च माध्यमिक गटात कु.श्रुती पंढरीनाथ धामणस्कर १२ वी, वाणिज्य विभाग, प्रथम क्रमांक संपादन करून तालुकास्तरीय सुयश संपादन केले आहे. Success of Patpanhale School in Taluk level competitions


तसेच गुहागर तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा तळवली हायस्कूलमध्ये नुकतीच संपन्न झाली. सदरच्या कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात कु.कस्तुरी समीर वझे इ.७ वी हिने तृतीय क्रमांक, माध्यमिक गटात मृण्मयी दत्ताराम जाधव इ.९वी हिने प्रथम क्रमांक व उच्च माध्यमिक गटात पियुषा शैलेश गुरव हिने द्वितीय क्रमांक संपादन केला. हस्ताक्षर व शुद्धलेखन तसेच कथाकथन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले आहे. Success of Patpanhale School in Taluk level competitions
हस्ताक्षर व शुद्धलेखन तसेच कथाकथन स्पर्धेतील सुयशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक चषक व प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तालुकास्तरीय हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा तसेच कथाकथन स्पर्धेतील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील, पर्यवेक्षक जी.डी.नेरले व प्राध्यापक- शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Success of Patpanhale School in Taluk level competitions