उच्च माध्यमिक गटात मृदुला पालकर प्रथम तर प्राथमिक गटात नेहा निवाते तृतीय
गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे दु. ह. वैद्य माध्यमिक विद्यालय व भा. सु. पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल विद्यालयात तालुकास्तरीय निबंध स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले आहे. Success of Patpanhale School in Essay Contest
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाची विद्यार्थिनी कु. मृदुला उदय पालकर (बारावी वाणिज्य शाखा) हिने उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक, कु. नेहा संदीप निवाते (इयत्ता सातवी) हिने प्राथमिक गटामध्ये तृतीय क्रमांक, कु. मानसी संदीप पालकर (इयत्ता आठवी) हिने माध्यमिक गटात सहभाग नोंदवला. Success of Patpanhale School in Essay Contest


तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या तीन गटांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक गटासाठी निसर्ग माझा सोबती हा विषय, माध्यमिक गटासाठी भारतीय अवकाश मोहिमा, उच्च माध्यमिक गटासाठी हे विश्वची माझे घर हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेतील यशस्वी व सहभागी विद्यार्थी यांना सौ. एस.एस. चव्हाण, श्री. सुरेश आंबेकर, श्री. एस.एस. घाणेकर, प्रा. सौ. एम.एस. जाधव, प्रा. श्री. डी.वाय. पवार आदी शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन लाभले. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण, उपाध्यक्षा श्रीम. सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण, प्राचार्य श्री. व्ही.डी. पाटील, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Success of Patpanhale School in Essay Contest