• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयाचे ऑनलाइन स्पर्धेत यश

by Mayuresh Patnakar
January 4, 2025
in Guhagar
139 2
0
Success of Patpanhale College
274
SHARES
782
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पेंटिंग स्पर्धेत शुभम मांडवकर प्रथम तर निबंध स्पर्धेत साहिल आग्रे द्वितीय

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला या वर्गात शिक्षण घेत असलेले शुभम मांडवकर याने राज्यस्तरीय ऑनलाइन पेंटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर साहिल आग्रे याने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. Success of Patpanhale College

रीजनल टीचर्स ऑर्गनायझेशन मार्फत महाराष्ट्र राज्यस्तरीय ऑनलाइन पेंटीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ग्रुप चौथा यंग आर्टिस्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी होता. यामध्ये शुभम मांडवकर (द्वितीय वर्ष कला) याने प्रथम क्रमांक पटकावला. तर हुंडा विरोधी चळवळ, मुंबई यांच्यावतीने “शिक्षणाचा वाढता प्रसार असूनही हुंड्यासारख्या समाजविघातक रूढीचे आजपर्यंत निर्मूलन का झाले नाही?” या विषयावर मराठी भाषेतील महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत साहिल आग्रे (द्वितीय वर्ष कला) याने द्वितीय क्रमांक पटकाविला तर कु. नेत्रा पाध्ये (प्रथम वर्ष वाणिज्य) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. Success of Patpanhale College

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रवीण सनये, प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. Success of Patpanhale College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuccess of Patpanhale CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.