गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र शासनाने अभियांत्रिकी, औषधनिर्माता व कृषीशास्त्र या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या परीक्षेत (एमएचटी-सीईटी 2023) कोयना एज्युकेशन सोसायटीमधील कोयना पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. Success of Koyna Pattern Students in MHT-CET Exam

बाळासाहेब देसार्इ महाविद्यालयातील कोयना पॅटर्नच्या पीसीएम ग्रुपमध्ये 8 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. विपूल विजय सुर्वे याने 99.18 टक्के, विक्रम सुनील कदम 98.34, यश संजय कदम 94.04, गौरी रमेश झेंडेकर 93.45, शुभंकर सुभाष कुंभार 92.67, आराध्य प्रविण जाधव 92.34, शुभम जयसिंग देसाई 91.88, यश मनोहर रासल 91.69 टक्के गुण मिळविले. तर युवराज खैरमोडे 89.96 टक्के, प्रियांका पवार 86.96, पवन चाळके 81.85, विक्रम चौधरी 79.39, मेहूल राजेशिर्के 79.39, अभिजीत ठोंबरे 79.26, मृणाल मस्के 71.40, संकेत मोरे 43.11 टक्के गुण मिळवून यश मिळविले. Success of Koyna Pattern Students in MHT-CET Exam
कोयना पॅटर्नच्या पीसीबी ग्रुपमध्ये 4 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. सोनाली संजय सुपूगडे 98.01 टक्के, आदिती रामचंद्र सारक 89, साक्षी विजय पाटील 97, तन्मयी चंद्रहार निकम 94.45 टक्के गुण मिळविले तर ईशिता सुपूगडे 87.83 टक्के, आदिती पाटील 86.29, सानिका खुंटाळे 85.67, ऋुतुजा कोळी 82, गिरीजा पाटील 76.07, साक्षी जयभाये 69.40, खुशी बांडे 69.35, सायली देसाई 40.33 टक्के गुण मिळवून यश मिळविले. Success of Koyna Pattern Students in MHT-CET Exam

यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, संचालक याज्ञसेन पाटणकर, संचालक संजीव चव्हाण, प्राचार्य डॉ. एच. डी. पवार, पर्यवेक्षक प्रा. डी. बी. देसाई यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Success of Koyna Pattern Students in MHT-CET Exam