गुहागर, ता. 15 : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा तळवली व हायस्कूल व हस्ताक्षर – शुद्धलेखन स्पर्धा कोतळूक हायस्कूलमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये गुहागर विद्यालयातील विद्यार्थांनी सुयश संपादन केले. Success of Guhagar High School Students
तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात कु. आर्या गणेश झगडे व माध्यमिक गटात कु. स्वरा मंगेश पाटील यांनी सहभाग नोंदवत प्राथमिक गटात आर्या गणेश झगडे या विद्यार्थिनीने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. सदर विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी निवड झाली. हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत प्राथमिक गटात कु. सौरभ संतोष जोगळेकर ५ वी, याने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात मधुरा संतोष पावसकर १०वी हिने उत्तेजनार्थ सुयश संपादन केले. Success of Guhagar High School Students

सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था, मुख्याध्यापक एस. एस. कांबळे, उपमुख्याध्यापिका सौ. एस.एस. कांबळे, पर्यवेक्षक एम. एस. गंगावणे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. Success of Guhagar High School Students