गुहागर, ता. 10 : या आधुनिकतेच्या युगात पोस्ट कार्यालयाचेही एक पाऊल पुढे असून टपाल खात्यात अग्रणीय बदल झाला. ग्राहक वर्गाचाही मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन अभिषेक पोळेकर यांनी केले. टपाल दिनानिमित्त श्री देव गोपाळ कृष्ण विद्यामंदिर गुहागर विद्यार्थ्यांनी गुहागर पोस्ट कार्यालयात भेट दिली त्या वेळेला ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना टपाल खात्याची माहिती दिली. Students visited the post office


गुहागर पोस्ट कार्यालयात टपाल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड, अंतर्देशी कार्ड, पोस्ट पाकीट, रेव्हुनी स्टॅम्प, पोस्टाची विविध तिकीट, साधे टपाल, स्पीड पोस्ट, मनीऑर्डर, टपाल ट्रेकिंग यांची माहिती देऊन त्यांचे कार्य कसे चालते याची सविस्तरपणे माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच आयपीबीपी, पोस्ट सेविंग खाते, टीडी, किसान विकास पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, मासिक प्राप्ती योजना, वरिष्ठ पेन्शन योजना, जीवन सुकन्या, पोस्टल इन्शुरन्स विविध योजनांची माहिती सविस्तरपणे पोस्ट कार्यालयात विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील शंकेचे निरसन केले. Students visited the post office


गुहागर पोस्ट मास्तर एस के दहिवलकर यांनी डाक दिनानिमित्त ऊन, पाऊस, वारा, थंडी असूनही अविरतपणे काम करणाऱ्या गुहागर कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या नऊ शाखा डाक घरातील सर्व कर्मचाऱ्यांची संवाद करून त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच नवीन खाते उघडण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी गुहागर पोस्ट मास्तर एस के दहीवलकर, प्रसाद दिवाडकर, दीक्षा मोरे, तुषार आरेकर, सुभाष केसरकर, पूर्वा रायकर, अनुष्का चव्हाण उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, शिक्षिका सावंत मॅडम, भोसले मॅडम व विद्यार्थी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. Students visited the post office