गुहागर, ता. 15 : लायन्स क्लब ऑफ गुहागर शहरातर्फे गुहागर तालुका, जिल्हा व विभागस्तरीय यश संपादन केलेल्या श्रीदेव गो.कृ. माध्यमिक विद्यामंदिर, सदानंद सुदाम पाटील विज्ञान श्री.महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै.विष्णूपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नुकताच गौरव समारंभ संपन्न झाला. Students honored by Lions Club
गुहागर तालुका मुख्याध्यापक संघातर्फे तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा व हस्ताक्षर – शुद्धलेखन स्पर्धांमध्ये गुहागर विद्यालयातील विद्यार्थांनी सहभाग नोंदवत उज्ज्वल सुयश संपादन केले. कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात आर्या गणेश झगडे व माध्यमिक गटात स्वरा मंगेश पाटील यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्राथमिक गटात कु. आर्या गणेश झगडे या विद्यार्थिनीने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. सदर विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धेत प्राथमिक गटात सौरभ संतोष जोगळेकर – ५ वी याने तालुक्यात द्वितीय क्रमांक संपादन केला. माध्यमिक गटात मधुरा संतोष पावसकर – १०वी हिने उत्तेजनार्थ क्रमांकाचे सुयश संपादन केले. Students honored by Lions Club
हिंदी बालबोधिनी परीक्षेमध्ये सान्वी शैलेंद्र खातू ५वी – या विद्यार्थिनीने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला. गुहागर तालुका विज्ञान प्रदर्शन निबंध स्पर्धेत कार्तिकी सुनील भोसले या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक संपादन केला. गुहागर तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनघा अभय साटले व मैत्रेयी मनोज शिंदे – १०वी या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. अखिल भारतीय विज्ञान मेळावा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनुष्का पंकज देवकर – ९वी या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ यश संपादन केले. तसेच विज्ञान प्रदर्शनात अर्नी राधेश्याम घाडे – ६वी या विद्यार्थिनीने बनवलेली विज्ञान प्रतिकृती कौतुकास पात्र ठरली. Students honored by Lions Club
विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा लायन्स क्लब ऑफ गुहागर शहर यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. गौरव समारंभासाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सीटीचे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे, सचिव मनिष खरे, खजिनदार माधव ओक, शामकांत खातू , संतोष वरंडे, डॉ. मयुरेश बेंडल, स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहिल आरेकर, सौरभ भागडे, श्री सुरेश देवळेकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एस. कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. उपमुख्याध्यापिका एस. एस. कांबळे यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक पी. बी जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गौरव समारंभासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. Students honored by Lions Club