• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर मनसेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
October 9, 2024
in Guhagar
152 2
0
Students felicitated by Guhagar MNS
299
SHARES
853
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच शृंगारतळी कार्यालयात संपन्न झाला. Students felicitated by Guhagar MNS

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक व गुणवंत विद्यार्थी कु.सिद्धार्थ अशोक पाष्टे व कुशल वैभवकुमार पवार तसेच इ.६ वीसाठी नवोदय परिक्षा निवड झालेला कुशल वैभवकुमार पवार, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थीनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर व मृण्मयी दत्ताराम जाधव तसेच ( एनएमएमएस ) राष्ट्रीय आर्थिक मागास विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थीनी मृण्मयी दत्ताराम जाधव या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्यातर्फे गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, चषक व गुलाबपुष्प देऊन शृंगारतळीमधील मनसे कार्यालयात नुकताच सत्कार करण्यात आला. Students felicitated by Guhagar MNS

या सत्कार समारंभासाठी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, शेतकरी संघटना – मनसे तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर यांसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुक्यातर्फे सत्कार केल्याबद्दल पाटपन्हाळे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, पर्यवेक्षक जी. डी. नेरले व शिक्षकवृंद तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. Students felicitated by Guhagar MNS

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarStudents felicitated by Guhagar MNSUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.