गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल मैत्री क्लबमध्ये बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल व प्री- प्रायमरीच्या लहान मुलांसाठी पदवीदान दिन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात विद्यार्थ्यांना गाऊन व कॅप परिधान करून पदव्या स्वरूपात प्रमाणपत्र देऊन विधीवत गौरविण्यात आले. Students did PhD research
या कार्यक्रमासाठी श्री. एस.पी. रेड्डी, के.एल.एल, सौ. सिंधू रेड्डी, डॉ. नागमणी, सीएमओ, आरजीपीपीएलचे डॉ.मंजुनाथ, श्री. अमित शर्मा, वरिष्ठ व्यवस्थापक, एचआर, व सौ. रेणू शर्मा. सौ. गुंजन शर्मा, व्यवस्थापक, एचआर, आरजीपीपीएल. सौ. अनुरूपा चटर्जी आदी उपस्थिती होते. उपस्थितांचे सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरजीत चटर्जी यांनी केले. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा केला जातो, याचे विवरण आपल्या प्रास्ताविकातून सादर केले. सौ. गुंजन शर्मा यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे कौतुक केले. Students did PhD research
शाळेतील शिक्षकांच्या परिश्रमामुळे रंगीबेरंगी वेशभूषेत गाणी व नृत्य सादर करणाऱ्या मुलांना टाळ्यांच्या कडकडाटाची भरभरून दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले गाणे व नाट्य सादारीकरणाने पालक आणि श्रोते यांना मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाल भारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चटर्जी, प्री- स्कूलच्या शिक्षिका सौ. धनश्री बावधनकर, प्रायमरीच्या सौ. प्राची मॅडम व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. Students did PhD research