चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली यांचा स्तुत्य उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाईदेवींच्या तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. या शिमगोत्सवानंतर प्रतिवर्षाप्रमाणे चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली येथील इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थांनी शिक्षकांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसराची साफ – सफाई करुन कच-याची योग्य विल्हेवाट लावली. Students carry out cleanliness drive after Shimgotsav


आबलोली, खोडदे गावातील सर्व समाजातील लोक फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर गावचे खोत, मानकरी, गावकर यांचे हस्ते होम पेटविले जातात व दुपारनंतर आबलोली येथील श्री. नवलाईदेवी, खोडदे गणेशवाडी येथील श्री नवलाईदेवी, सहानेचीवाडी येथील श्री. नवलाईदेवी या तिन्ही बहिणींची गळाभेट सोहळा कै. दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानात उत्साहात, जल्लोषात संपन्न झाला. या उत्सव सोहळ्यात सहाणे जवळील जागेत जत्रा भरते. यावेळी महिला – पुरुष आणि लहान मुले खाऊची रिकामी पाकिटे, प्लास्टिकच्या पाणी बॉटल आणि अन्य कचरा या संपूर्ण जत्रेच्या परिसरात पडलेला असतो. Students carry out cleanliness drive after Shimgotsav