संदेश कदम, आबलोली
रत्नागिरी, ता. 02 : चिपळूण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री – आबीटगाव येथे १९९४ ते २०२३ अशा तीस बॅचेस एकत्रित येऊन माजी विद्यार्थी स्मृती गंध सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ३०० ते ३५० माजी विद्यार्थी उपस्थित होते. या तीस वर्षात ५० ते ५५ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत होवून गेले होते. त्यापैकी ३० जणांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. त्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. Student Smurtigandh ceremony at Abitgaon
या कार्यक्रमाला शाळेचे आजी मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी शिक्षक तसेच आजी विद्यार्थी आणि शालेय समिती यांनी अनमोल सहकार्य केले. तसेच नांव नोंदणी, नाष्टा, भोजन, मंडप सजावट, मंचक व्यवस्था, निमंत्रण व्यवस्था हि कामे नियोजनबद्ध स्थानिक माजी विद्यार्थी कमिटीने व मुंबई आयोजन कमिटी यांनी केले होते. दोन्ही कमिटीच्या सुसंवादाने कार्यक्रम यशस्वी झाला. सुरुवातीच्या काळात या शाळेचे बीजारोपण करणारे सर्वच शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच चार गावातील सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्याचप्रमाणे सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे या संस्थेचे संचालक मंडळ यांची सुद्धा उपस्थिती लाभली. Student Smurtigandh ceremony at Abitgaon


या शाळेने असंख्य उद्योजक, डॉक्टर, वकील, शिक्षक, कलाकार, छायाचित्रकार इतर क्षेत्रातील मंडळी घडवली आहे. त्यामुळे शाळेला सहकार्य करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची आठवण शाळेत असावी म्हणून “माझी शाळा ” अशी नामनिर्देश असणारी आणि शाळेची महती सप्ष्ट करणारी एक फ्रेम आणि संविधानाची उद्देशपत्रिका शाळेला भेट स्वरूपात देण्यात आली. तसेच अनेकांनी भेट स्वरूपात अनेक गरजेच्या गोष्टी भेट स्वरूपात दिल्या. अशा रीतीने हा स्मुर्तीगंध पुनर्मिलन अभूतपूर्व सोहळा घडून आला. न भूतो न भविष्यती अशी या सोहळ्याची ख्याती झाली. ज्यांनी हा नेत्रदीपक सोहळा याची देही याची डोळा पाहिला अनुभवला ते कृतार्थ झाले. अखेर या कार्यक्रमाची सांगता आजी माजी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. Student Smurtigandh ceremony at Abitgaon