गुहागर, ता. 09 : सलाम मुंबई फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय बाल परिषदेसाठी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा काताळे नं. १ या शाळेतील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे काताळे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे. Student Selection for National Children’s Council
राष्ट्रीय बाल परिषदेसाठी वेदांत अशोक डिंगणकर, आर्यन रामचंद्र भागाडे, शर्वरी अमित बारस्कर, संस्कृती गजानन बारस्कर, आर्या विनोद बारस्कर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थांचे त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच मुख्याध्यापक माधवी पाटील, उपशिक्षक सचिन सोनवलकर, अजित कांबळे, दिपक चव्हाण आदीचे काताळे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे. Student Selection for National Children’s Council