रत्नागिरी, ता. 25 : खेडमधील एका शाळेतील चार विद्यार्थी बेशुद्धावस्थेत आढळून आले. या घटनेने खेडमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेडमधील देवघर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. शाळेतील विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडल्याने शिक्षकही चक्रावून गेले आहेत. त्यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. या बेशुद्ध मुलांमध्ये तीन मुली एक मुलाचा समावेश आहे. Student fainted at Khed school
खेड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल देवघर-निवाचीवाडी या शाळेतील विद्यार्थी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक बेशुद्ध असल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश आहे. चार मुले बेशुद्ध असल्याची माहिती शिक्षकांना मिळताच चौघांनाही घेऊन शाळेच्या मुख्याध्यापकांनी खाजगी गाडीने कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. हे विद्यार्थी इयत्ता आठवी आणि दहावीतील असल्याचे समजते. शाळेत विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धक्का बसला. पालक शाळेकडे तातडीने रवाना झाले. बेशुद्धावस्थेत विद्यार्थांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. चक्क चार विद्यार्थी बेशुद्धावस्थेत सापडल्याने पालकही चक्रावून गेले आहेत. नेमके कारण काय असावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेशुद्धावस्थेत असलेल्या ३ मुलींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिद्धी गणेश पवार (वय १३, जैतापूर. ता. खेड), मोहिनी रवींद्र पवार (वय १३, मांडवे ता. खेड), निधी गजानन जाधव (वय १५, रसाळगाड ता खेड) आणि युवराज सुधीर यादव (देवघर) अशी बेशुद्ध पडलेल्या मुलांची नाव आहे. या चौघांवर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. मात्र, बेशुद्ध पडण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. Student fainted at Khed school