• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बांधकाम त्वरीत थांबवावे अन्यथा आमरण उपोषण

by Guhagar News
August 31, 2024
in Guhagar
129 1
0
Strike to death if construction is not stopped
253
SHARES
724
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मासू बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी मागणी

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील मासू  गावाची ग्रामपंचायत इमारत सन १९८४ पासून म्हणजे जेव्हा पासून मासू ग्रामपंचायत अस्तित्वात आली तेव्हा पासून फेब्रुवारी २०२४ पर्यंत गावाची  भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन गावाच्या मध्यभागी, मध्यवर्ती ठिकाणी बौद्धवाडी येथे बांधण्यात आली होती. हि इमारत गेली ४० वर्षे बौद्धवाडी येथेच होती. Strike to death if construction is not stopped

हि इमारत सुस्थितीत असतानाही ग्रामपंचायत सरपंच व तात्कालीन ग्रामसेवक यांनी नविन ग्रामपंचायत इमारत बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मधून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडे पाठविण्यात आला. सदर ग्रामपंचायत इमारतीसाठी जिल्हा वार्षिक नियोजन मधून (अंतर्गत) ग्रामपंचायत नविन इमारत मंजूर करण्यात आली तसेच इमारतीचे भूमिपूजन अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत इमारतीच्या समोर करण्यात आले परंतू सदरील ग्रामपंचायत इमारत तेथे न बांधता मासू खुर्द येथे जंगलमय ठिकाणी बांधण्याचे बांधकाम चालू आहे. सदरचे बांधकाम हे अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत जागेवर बांधण्यासाठी प्रस्ताव करण्यात आला परंतू प्रस्ताव केलेल्या जागेवर इमारत न बांधता आम्हा ग्रामस्थांची व शासन यंत्रणेची फसवणूक करण्यात आलेली आहे. या इमारतीच्या प्रस्तावाची माहिती आंम्हा ग्रामस्थांना मिळावी. तसेच ग्रामसेवक आणि सरपंच यांचे संगनमताने गावाची दिशाभूल करण्यात येत आहे. Strike to death if construction is not stopped

विशेष ग्रामसभेमध्ये या चाललेल्या कारभाराबाबत सरपंच यांना विचारले असता त्यांनी ग्रामसभेमध्ये  किंवा बॉडीच्या  मिटींग वरती विचार विनिमय न करता सरपंच महोदयांनी स्वतः च्या मताने  मी जुनी इमारत तोडली त्याला  मी स्वतः जबाबदार आहे बाकी सदस्यांनी विचारु नये असे वक्तव्य केले. सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेच्या इतिवृत्तामध्ये  नमुद न करता ग्रामसभेमध्ये दिशाभूल केली. याला जबाबदार कोण? तसेच सदरील ग्रामपंचायत इमारत जंगलमय भागामध्ये मासू खुर्द येथे या इमारतीचे बांधकाम चालू करण्यात आले आहे. Strike to death if construction is not stopped

तरी सदरील इमारतीचे बांधकाम ताबडतोब थांबविण्यात यावे, आणि बांधकामावर करण्यात येणारा खर्च थांबविण्यात यावा, तसेच ग्रामपंचायतीची नविन इमारत ही बौद्धवाडी येथेच बांधण्यात यावी, तेच गावाच्या सोयीच्या दृष्टीने योग्य ठरेल यासाठी लागणारी जागा जागा मालक विनामूल्य देण्यास तयार आहेत. त्यामुळे ४०  वर्षापासून अस्तित्वात असलेली  जी ग्रामपंचायतीची इमारत होती ती बौद्धवाडी येथे त्याच ठिकाणी बांधण्यात यावी, अशी आंम्हा बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची नम्र विनंती आहे. तसे न झाल्यास नाईलाजास्तव आंम्ही सर्व ग्रामस्थ पंचायत समिती गुहागर यांचे विरोधात न्यायिक आंदोलनास उतरु याची स्पष्ट नोंद घ्यावी. आमच्या मागणीचा त्वरित विचार करावा व सहकार्य करावे. अन्यथा:आंम्ही मासू गावातील सर्व ग्रामस्थ ५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रस्ताविक  इमारतीच्या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबवू याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, असे लेखी निवेदन मान. गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर यांना दिले असून या निवेदनाच्या प्रती १) मान. तहसीलदार साहेब गुहागर, २) पंचायत समिती बांधकाम विभाग गुहागर, ३) मान. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी रत्नागिरी, ४) मान. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे गुहागर यांना पाठविण्यात आल्या आहेत. Strike to death if construction is not stopped

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarStrike to death if construction is not stoppedUpdates of Guhagarआमरण उपोषणगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.