गुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
गुहागर, ता. 23 : विशालगडाच्या गजापूर येथील निष्पाप महिला, पुरुष, वयोवृद्ध व लहान मुलांवर झुंडीने येऊन भ्याड हल्ला करणाऱ्या तसेच पवित्र मशिदीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन गुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे सदर निवेदन तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. Statement to Tehsildars by Muslim Samaj Sanstha
या निवेदनामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या विशालगड गजापूर येथे माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबाबत आम्ही आपले लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर पराक्रमाची गाथा दर्शविणारी भूमी म्हणजेच विशालगड. महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. परंतु, सध्या विशालगडावरील अतिक्रमणाचा विषय पुढे घेऊन काही समाजकंटक मुस्लिम समाजावर अमानुषपणे हल्ला करित आहेत. नुकतेच शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये माणूसकीला लाजविणारी घटना घडली आहे. विशालगडाच्या अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसतानाही येथील गजापूर गावात समाजकंटकांनी झुंडीने जाऊन येथील महिला, पुरुष, वयोवृद्ध व तसेच लहान मुलांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर निर्घृणपणे शस्त्रे चालविण्यात आली, त्यांच्या मालमत्तेची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. तसेच पवित्र मशिदीमध्ये घूसून मशिदीची विटंबनाही या समाजकंटकानी केली. हे सगळे दृष्य अत्यंत विदारक आणि माणूसकीला काळीमा फासणारे आहे. या घटनेमुळे मुस्लिम समाज अधिकच भयभित झालेला आहे. Statement to Tehsildars by Muslim Samaj Sanstha
महाराष्ट्रात अजूनही कायद्याचे राज्य आहे असे म्हटले जाते परंतु यावरील सर्वसामांन्यांचा विश्वास कमी होत चालला आहे. अशा झुंडीने येऊन निष्पाप लोकांवर हल्ले होत असतील तर मुस्लिम समाजाने कोणाकडे न्याय मागायचा? आम्ही सदर घटनेचा या देशाचे आणि राज्याचे जबाबदार व देशभक्त नागरिक म्हणून जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीत मुस्लिम बांधवांना नमाज पडण्यासाठी स्वतंत्र मशिदीची तरतूद केली होती. असे अनेक दाखले इतिहासात आहेत. शिवाजी महाराज हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ज्वलंत उदाहरण आहेत. Statement to Tehsildars by Muslim Samaj Sanstha
विशालगडावरील शेकडो वर्षांपूर्वी वसलेली हजरत मलिकरेहान दर्गा आणि त्याच्या अवती भोवती वास्तव्यास असणारे मुस्लिम बांधवही याच भूमीचे नागरिक आहेत. त्या ठिकाणी अतिक्रमण असेल तर, कायद्याच्या चौकटीत त्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, या अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसणाऱ्या गजापूर येथील निष्याप मुस्लिम बांधवांवर अमानुषपणे हल्ला करून महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक षडयंत्र रचून करीत आहेत. याची सखोल चौकशी हाणेही अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा, शिवभक्त कधिच अशा पद्धतीचे अमानुष कृत्य करणार नाही, याचीही खात्री आम्हाला आहे. हे समाजकंटक कोण आहेत व यांच्या पाठीशी कोणकोणत्या शक्त्या आहेत याचा शोध शासनाने तातडीने घेणे गरजेचे आहे. गुहागर तालुक्यातील समस्त मुस्लिम समाज आपणाकडे या निवेदनाद्वारे आपल्या स्तरावर या घटनेची तातडीने सखोल चौकशी करुन संबंधित समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी व यापुढे धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या कोणत्याही वृत्तीला बळ मिळणार नाही अशी यामध्ये विनंती करण्यात आली आहे. Statement to Tehsildars by Muslim Samaj Sanstha
यावेळी गुहागर तालुका मुस्लिम समाज संस्थेचे अध्यक्ष साबीर भाई साल्हे, सचिव इकबाल पंची, उपाध्यक्ष इरफान दळवी, शब्बीर माहीमकर, मज्जिद केळकर, शरीफ ठाकूर, मौलाना युनूस मुल्लाजी, सल्लागार निसारखान सरगूरो उपस्थित होते. Statement to Tehsildars by Muslim Samaj Sanstha