गुहागर, ता. 22 : जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. 2 शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले दिनेश काशिनाथ जाक्कर यांना गेल्या २६ वर्षाच्या केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मान म्हणून प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे आणि प्रसिद्ध लेखिका अंजलीताई अत्रे यांच्या हस्ते राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. State level award to Dinesh Jakkar
नवी दिशा, नवे उपक्रम या राज्यस्तरीय शैक्षणिक समूहाच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांना या समूहाचा फायदा होत आहे. समूहाच्या माध्यमातून, समूह सदस्यांच्या सहभागातून देणगी दाते यांनी दिलेल्या मदतीने दरवर्षी नवनवीन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्रित करून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबविलेल्या उपक्रमांचे पुस्तक प्रकाशन. तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. State level award to Dinesh Jakkar
दिनेश काशिनाथ जाक्कर यांनी आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर शाळेलाही विविध सन्मान मिळवून दिले आहेत. २०२० – २१ चा आदर्श शाळा पुरस्कार, २०२३ -२४ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात शाळेला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे एक लाखाचे पारितोषिक मिळाले आहे. सन २०२४ – २५ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – 2 या अभियानात शाळेला प्रथम क्रमांकाचे तीन लाखाचे बक्षिस मिळाले आहे. आज अखेर पंधरा लाखाचा शैक्षणिक उठाव केला आहे. शाळा १०० % प्रगत असून लोकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे. या मिळालेल्या सन्मानाबद्दल आबलोली बीटाचे विस्तार अधिकारी विश्वास सुकलाल खर्डे यांनी अभिनंदन केले आहे. State level award to Dinesh Jakkar
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे, प्रसिद्ध लेखिका अंजलीताई अत्रे, संपादक / समूह संयोजक देवराव चव्हाण, बळीराम जाधव, संगीता म्हस्के, पर्यावरण समूह राज्याध्यक्ष प्रमोद मोरे आदी उपस्थित होते. या मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दिनेश जाक्कर यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. State level award to Dinesh Jakkar