“ब्लाटेंटिया” या काव्यसंग्रहास “पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा” पुरस्कार प्रदान
आबलोली, संदेश कदम
गुहागर, ता. 13 : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरूनगर पुणे यांच्यावतीने प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डाँ बाळासाहेब लबडे न्यू इरा पब्लिकेशन पुणे प्रकाशित “ब्लाटेंटिया” या काव्यसंग्रहास “पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रसिद्ध समाजसेवक डाँ अभिजित सोनवणे ,पत्रकार, कवी विजय चोरमारे, ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील, प्रसिद्ध साहित्यिक, युवासाहित्य अकादमीकार, ऐश्वर्य पाटेकर म.सा.प.शाखा खेड, अध्यक्ष, श्री संतोष गाढवे, श्री पुरूषोत्तम सदाफुले, यांच्या हस्ते सन्माचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, देऊन गौरविण्यात आला. State level award for Labade anthology
याच कवितासंग्रहास बाबुराव पेटकर काव्यसन्मान, चंद्रपुर. नारायण सुर्वे काव्यपुरस्कार नाशिक या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मराठीतील वेगळी कविता म्हणून या संग्रहाची समीक्षा मान्यवरांनी केली आहे. तिच्यातील काही कवितांचे इंग्रजीत भाषांतरही झाले आहे ती वाचकांच्या पसंतीस उतरत आहे. डाँ लबडे यांना आत्तापर्यंत त्याच्या सोळा पुस्तकांना विविध तीस पुरस्कार मान्यवर संस्थांचे प्राप्त झाले आहेत. त्याचे कादंबरी कविता समीक्षा संशोधन या क्षेत्रात मोठे योगदान आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. State level award for Labade anthology