• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के

by Guhagar News
May 13, 2025
in Maharashtra
138 1
0
State 10th result 94.10 percent
270
SHARES
772
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकण विभाग अव्वल; तर यंदाही मुलींचीच बाजी

पुणे, ता. 13 : राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे. State 10th result 94.10 percent

निकालाची विभागनिहाय टक्केवारी

पुणे  : 94.81 टक्के
नागपूर : 90.78 टक्के
संभाजीनगर : 92.82 टक्के
मुंबई : 95.84 टक्के
कोल्हापूर : 96.78 टक्के
अमरावती : 92.95 टक्के
नाशिक : 93.04 टक्के
लातूर : 92.77 टक्के
कोकण : 99.82 टक्के

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत 10 दिवस लवकर घेतल्या. निकालही 15 मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी 23 हजार 492 माध्यमिक शाळांतून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख 64 हजार 120 मुले, तर सात लाख 47 हजार 471 मुली आहेत. State 10th result 94.10 percent

तसेच 19 तृतीयपंथीयांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागात 98.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूर विभागात 90.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी सरस ठरली आहे. राज्यात 96.14 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 92.21 टक्के मुलं विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. State 10th result 94.10 percent

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarState 10th result 94.10 percentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share108SendTweet68
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.