शृंगारतळीतील खड्डे बुजवण्यास सुरुवात
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ पूल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडले होते. सदरचे खड्डे वाहन चालकांना तसेच प्रवाशांना जीव घेणे ठरत होते या रस्त्यावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल तसेच रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला होता. Starting to fill the pits in Sringaratali
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत जनतेच्या मनात असंतोष असून या सर्व जनतेला सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयावरती उग्र आंदोलन छेडण्यात येईल. असाही इशारा त्यांनी दिला होता. सदरचे खड्डे अनेक वेळा बुजविण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराकडून करण्यात आले. परंतु खड्डे बुजवताना ठेकेदाराकडून दर्जेदार काम होत नसल्याने सतत या रस्त्यावर खड्डे पडले जात आहेत. खड्डे बुजवविताना ठेकेदार थातूरमातूर काम करत असल्याने पुन्हा पुन्हा या ठिकाणी खड्डे पडत होतें. या संदर्भात अनेक वेळा संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना सूचना व चर्चा करूनही याकडे संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही विनोद जानवळकर यांनी केला होता. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची ये जा सुरू असते. मोठ्या खड्ड्यातील साचलेले चिखल युक्त पाणी विद्यार्थी व प्रवाशांच्या अंगावर उडण्याचे प्रकार सतत घडत आहेत. शाळेत जात असताना विद्यार्थ्यांच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडाल्याने विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत होते. Starting to fill the pits in Sringaratali
त्याचप्रमाणे पूल मार्केट पुला नजीक अनेक व्यापारी व्यवसाय करत आहेत, त्यामुळे वाहने जात येतं असताना या खड्ड्यातील चिखल युक्त पाणी त्यांच्या दुकानावरती उडण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तरी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी याची त्वरित दखल घेऊन सदर खड्डे बुजविण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला द्याव्यात अशी मागणीही विनोद जानवळकर यांनी केली होती अखेर त्यांच्या मागणीला यश आणि असून शुक्रवारी रात्री सदरचे खड्डे संबंधित ठेकेदाराने सिमेंट काँक्रीट ने बुजविण्यास सुरुवात केली आहे. सदरच्या खड्डे भरताना स्वतः मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर उपस्थित होते. Starting to fill the pits in Sringaratali