एसटीच्या नऊ फेऱ्या जामसुत पिंपर मार्गे व्हाया होणार
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कोस्टल मार्गावरील पालशेत येथील नवीन पुलाचे काम सुरू असताना सदर पुलावरून वाहतूक सुरू करण्याकरिता असलेला अप्रोच पूर्ण करण्याकरता 10 जून ते 14 जून या कालावधीत एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र फेऱ्या बंद करताना केवळ पालशेत ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केल्याचे पुढे आले आहे. ST tours closed on Palshet route
तालुक्यातील पालशेत येथील बाजार पुलावरून दरवर्षी पाणी वाहून जातं याचबरोबर बाजारपेठेमध्ये पाणी भरते यावर उपाय योजनेकरिता तसेच सदर पूल धोकादायक बनला असल्याने या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. दरम्यान सदर काम अंतिम टप्प्यात आले असून या पुलाच्या दोन्हीबाजूला अॅप्रोज बनविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला चार दिवसाची मुदत आवश्यक आहे याकरिता या मार्गावरील एसटी फेऱ्या बंद करण्यासाठी गुहागर आगाराकडे मागणी केली आहे .गुहागर आगाराने गुहागर पालशेत आणि उर्वरित फेऱ्या गुहागर शृंगारतळी जामसुद पिंपर मार्गे वेळणेश्वर, हेदवी, नरवण, तवसाळ अशा फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत अशी माहिती गुहागर आगर प्रमुख सोनाली कांबळे यांनी दिली. ST tours closed on Palshet route
दरम्यान सदर पुलाचे काम येत्या चार दिवसांमध्ये पूर्ण करून या पुलावरून वाहतूक पूर्ववत करण्यात येईल व चार दिवसांमध्ये अॅप्रोच रस्ता करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर उप अभियंता सलोनी निकम यांनी दिली. यामुळे आजपासून गुहागर पालशेत मार्गे एकही एसटी जाणार नाही याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आली आहे तर अडूर येथील प्रवाशांना अडूरबोऱ्या फेरी हवी असल्यास याचाही विचार करण्यात येईल, असे आगार प्रमुख सोनाली कांबळे यांनी सांगितले. ST tours closed on Palshet route