गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पेवे खामशेत भोईवाडी येथे सायंकाळी 5.15 च्या सुमारास गुहागर पेवे पांगारी एसटी बस चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात झाला. या अपघातामध्ये दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तात्काळ हॉस्पिटल मध्ये उपचार करून घरी सोडले. ST Bus Accident


सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याच प्रकारचे नुकसान झाले नाही तसेच अन्य कोणाला दुखापत झाली नसून वाहक व चालक व प्रवासी सुखरूप आहेत. पेवे गावचे ग्रामस्थ दिनकर पारधी, खालीद खान सरगुरो, संदेश निवाते, विकास पडवळ, फराहान खान सरगुरो, मधुकर पडवळ, बाळकृष्ण पडवळ तसेच महिला वर्ग सायली पारधी, रश्मी पारधी, नम्रता निवाते, सुहासिनी पडवळ, नंदा निवाते यांनी दुखापत झालेल्या महिलांची चौकशी केली. तसेच ग्रामस्थांनी अपघातस्थळी वेळेवर पोहोचले व मदतकार्य केले. ST Bus Accident