रत्नागिरी, ता. 22 : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे सीए, करसल्लागार व कर्मचाऱ्यांच्या स्पोर्टस् कार्निव्हलला (क्रीडा महोत्सव) आजपासून प्रारंभ झाला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर या स्पर्धेचा प्रारंभ एसआर, लोहपुरुष डॉ. नितीन सनगर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन आदी विविध स्पर्धा होणार असून दि. २४ रोजी सायंकाळी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. Sports competitions for CA, tax advisors begin
यावेळी डॉ. नितीन सनगर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पोर्ट्स कार्निव्हलमध्ये सर्वांनी खेळ आणि कौशल्याचे प्रदर्शन करा. क्रीडास्पर्धा म्हणजे फक्त प्रतिस्पर्ध्याला हरवणे एवढंच नाहीये तर तुमची एकाग्रता, एकता, आत्मविश्वासाची परीक्षा आहे. यातून तुम्ही शारीरिक क्षमता आजमावू शकता. क्रीडा स्पर्धांमधून सांघिक भावना तयार होते. जसे वर्षभर तुम्ही ग्राहकांचा ताळेबंद बनवून आर्थिक नियोजन करता, तशाच प्रकारे खेळातही समतोल साधा. Sports competitions for CA, tax advisors begin


डॉ. सनगर हे सायकलिंगमधील एसआर (सुपर रॅंडोनिअर), लोहपुरुष आहेत. त्यांनी आतापर्यंत धावणे, पोहणे व सायकलिंगच्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. याबद्दल त्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. यानंतर त्यांनी ४ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या तृतीय कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सीए, करसल्लागार संस्थांनी सहभाग घेऊन प्रतिनिधीत्व करावे, असे आवाहन करावे. ज्याप्रमाणे वेळेपूर्वीच कर भरण्यासाठी ग्राहकाला जागरूक करता त्याप्रमाणे आपल्या ग्राहकांनाही नोंदणी करण्याचे आवाहन करावे, असे सांगितले. Sports competitions for CA, tax advisors begin


करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा संस्थेचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित, उपाध्यक्ष राजेश गांगण, सेक्रेटरी सीए वैभव देवधर, कोषाध्यक्ष सीए अभिजित पटवर्धन व संचालक मंडळाचे सदस्य आणि सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, उपाध्यक्ष सीए शैलेश हळबे, खजिनदार सीए केदार करंबेळकर, एंजल ब्रोकिंगचे प्रतिनिधी, करसल्लागार प्रतिनिधी राजेश सोहनी, क्रीडा संचालक डॉ. शिंदे आदींसह ज्येष्ठ सीए उपस्थित होते. Sports competitions for CA, tax advisors begin