गुहागर, ता. 26 : पंचायत समिती शिक्षण विभाग व बेटस्तरीय क्रीडा समिती आयोजित केंद्राच्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अंजनवेल येथे संपन्न झाल्या. या स्पर्धांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन अंजनवेलच्या सरपंच सोनल मोरे मॅडम यांचे शुभहस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धा विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. Sports competition held at Anjanvel
यावेळी बीट विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे म्हणाले की, सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास्तव्य करत असतं .विद्यार्थ्यांच्या अंगी चपळता, नेतृत्व क्षमता हे गुण विकसित होतात. या लाल मातीतून भावी चांगले खेळाडू निर्माण होतील, विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन करून खिलाडी वृत्ती दाखवून आपला खेळ मैदानावर दाखवावा व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित करावे असे त्यांनी प्रतिपादन केले. Sports competition held at Anjanvel
यावेळी लहान गट मोठे गट, मुलगे, मुली यांचे कबड्डी, लंगडी, खो खो, क्रिकेट, लांब उडी, उंच उडी, धावणे, थाळीफेक, गोळा फेक इत्यादी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व बक्षीसे व मैदान ग्रामपंचायती अंजनवेल यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच सोनल मोरे मॅडम व इतर देणगीदार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Sports competition held at Anjanvel
यावेळी बीट विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे, माजी सरपंच यशवंत बाईत, केंद्रप्रमुख आरोही शिगवण, किरण सूर्यवंशी, निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अ समद आचरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नदीम काकडे, अध्यक्ष श्री विजय मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य फौजीया पठाण, वहिदा खतीब, जमातुल मुस्लिम बागमहोल्याचे अध्यक्ष अहमद वालपकर, शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, उर्दू संघटनेचे अध्यक्ष साजिद मुकादम, अखिल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, समितीचे तालुकाध्यक्ष, बेलेकर, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल धुमाळ, मुख्याध्यापक ईश्वर वसावे, सुभाष गमरे, राजेंद्र वानरकर, अश्फाक कारभारी, इसाक कारभारी, मोरेश्वर वायंगणकर, समीर धामणसकर, समीर बामणे, नदीम कोतवडेकर, निलेश खामकर, सुनील वरेकर, निळकंठ पावसकर, दिनेश जानवळकर, राजू सुर्वे, संजय आवटे, गणपत निंबरे, तुकाराम नांदगावकर, रमेश शिंदे, संजना पवार प्रभागातील सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू हंबर्डे व महेश आंधळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीट गुहागर मधील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले. Sports competition held at Anjanvel