• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एन.एस.एस. मधून सशक्त संस्कारित नागरिक घडतात; सतीश शेवडे

by Guhagar News
November 8, 2024
in Ratnagiri
89 1
1
Special Camp at Radha Purushottam Patwardhan School
175
SHARES
500
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 08 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीराच्या उद्घाटनात सतीश शेवडे यांनी प्रतिपादन केले. राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर, कुर्धे येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर रत्नागिरी एयुकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शिक्षण सुधारक समितीचे कार्यवाह आनंद मराठे, ग्रुप ग्रामपंचायत मेर्वीचे प्रशासक नरेंद्र पर्‍हाते, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनिल गोसावी, कार्यक्रमाधिकारी निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा.स्नेहा बाणे, उपस्थित होते. Special Camp at Radha Purushottam Patwardhan School

यावेळी  ग्रुप ग्रामपंचायत मेर्वीचे प्रशासक श्री. नरेंद्र पर्‍हाते यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शिबीराला शुभेच्छा दिल्या. प्रा. सुनिल गोसावी यांनी शिबीरात आत्मविश्‍वास वाढीस पूरक उपक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व सत्रात मनापासून सहभागी होण्याचे आवाहन केले. व शिबीराचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग करुन घ्या असे सांगितले. प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी आपल्या मनोगतात NSS सुसंस्कृत छात्रशक्ती निर्माण करते असे सांगितले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी NSS सामाजिक समस्या निराकरण करणारा, स्वयंशिस्त, स्वावलंबनयुक्त जागरुक व सत्यप्रिय नागरिक  घडवतो असे सांगितले. कार्यवाह श्री. आनंद मराठे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर रहात शिबीरात ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घ्यावा. फुलासारखे समर्पित जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन केले. Special Camp at Radha Purushottam Patwardhan School

अध्यक्षीय भाषणात सतीश शेवडे यांनी शिबीरातून चांगले नागरिक घडविण्याची यशस्वी परंपरा एन.एस.एस. मध्ये आहे असे सांगितले. आनंददायी शिबीरातून भविष्यासाठी चांगले सोबती मिळतात व एन.एस.एस च कुटुंब तयार होतं. एन.एस.एस माजी स्वयंसेवक या नात्याने त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व शिबीराला शुभेच्छा दिल्या. या निवासी शिबीरांतर्गत श्रम संस्कारातून वनराई बंधारा, भात कापणीचा अनुभव, गणेशगुळे गणपती मंदिर परिसर व शाळा परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या बौध्दिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळा, व्याख्याने, खेळ, चर्चासत्रे, स्पर्धा इ. चे आयोजन कण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी केले. व आभार प्रा. अभिजीत भिडे यांनी मानले. या शिबीराचे नियोजन प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एन.एस.एस. कार्यक्रमाधिकार्‍यांनी केले. Special Camp at Radha Purushottam Patwardhan School

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSpecial Camp at Radha Purushottam Patwardhan SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.