“शेवटची लाओग्राफीया” या कादंबरीस कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रदान
गुहागर, ता. 19 : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 2022-23 चे पुरस्कार नुकतेच वितरित करण्यात आले. यात प्राध्यापक बाळासाहेब लबडे यांच्या अथर्व पब्लिकेशन जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या “शेवटची लाओग्राफिया” या कादंबरीस “विशेष कादंबरी पुरस्कार” कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, समीक्षक डॉक्टर सुरेश जोशी, कोमसापाच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, रमेश कीर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. “Special Award” for Labade’s novel
“शेवटची लाओ ग्रफिया” या कादंबरीस राज्यस्तरीय अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मराठी कादंबरीतील वेगळी कादंबरी म्हणून तिचा उल्लेख पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री नामदेव कांबळे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यासारख्या अनेक मराठीतील दिग्गज समीक्षकांनी तिचे स्थान अधोरेखन केलेले आहे. डॉक्टर बाळासाहेब लबडे हे समीक्षक, कवी, कादंबरीकार, कथाकार, गझलकार, संपादक, मार्गदर्शक, चित्रपट, गीतकार, संशोधक, अभ्यासक आहेत. त्यांचे आत्तापर्यंत 17 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्याबद्दल विविध स्तरातून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. या पुरस्काराबद्दल डॉक्टर लबडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. “Special Award” for Labade’s novel