गुहागर, ता. 03 : एका 10 वर्षाच्या मुलाने आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मुलाच्या हातामधून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने हल्ला केला. ही घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. Son attacks mother with bat
मुलगा फोन पाहण्यामध्ये व्यस्त असताना त्याची आई तिथे येते व ती मुलाला फोनच्या वापरावरून रागे भरते. ती त्याच्या हातामधील फोन काढून घेते व त्याला अभ्यासाला बसायला सांगते. मुलगा निमुटपणे सर्व काही ऐकतो. त्यानंतर थोड्यावेळाने तो आत जातो व नंतर शेजारी ठेवलेल्या बॅटने आईवर हल्ला करतो. आई बेशुद्ध पडते व मुलगा परत फोनवर खेळू लागतो. Son attacks mother with bat


अहवालानुसार, घटनेनंतर काही वेळाने घरातील इतर सदस्यांनी महिलेला पाहिले आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुलाचे वय केवळ 10 वर्षे असल्याने, ही घटना अधिकच चिंताजनक आहे. मोबाइल आणि डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय घातक परिणाम होऊ शकतात, हे या घटनेने अधोरेखित केले आहे. Son attacks mother with bat