• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

साखरी बुद्रुक खुर्द गावात सामाजिक शेत उपक्रम

by Mayuresh Patnakar
July 22, 2024
in Guhagar
101 1
2
Social Farming Activities in Sakhri Khurd Village
198
SHARES
566
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोकगीते म्हणत दिड एकरवर अंकुर 101 ची लावणी

गुहागर, ता. 22 : मनुष्यबळाअभावी ओसाड पडणाऱ्या शेत जमीनीवर सामाजिक शेत करण्याचा उपक्रम साखरी बुद्रुक खुर्द गावातील ग्रामस्थांनी यशस्वी केला आहे. आज दिड एकर क्षेत्रात 80 ते 85 स्त्री पुरुषांनी एकत्र येत अंकुर 101 या भातरोपोंची लावणी केली आहे. यासाठी कुणबी एकता सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला. Social Farming Activities in Sakhri Khurd Village

Social Farming Activities in Sakhri Khurd Village

कोकणातील अनेक शेतजमीनी आज ओसाड पडल्या आहेत. मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. शेती करणे परवडत नाही. वन्य प्राण्यांचा उपद्रव होतो. अशी विविध वास्तववादी कारणे यामागे आहेत. शेतीऐवजी नोकरी केली तर अधिक पैसा मिळतो म्हणून येथील तरुण शहराकडे वळतो आहे. त्यामुळे गावागावांमधील घरात केवळ वार्धक्याकडे झुकणारी मंडळी पहायला मिळतात. शासनाकडून शेतीला प्रोत्साहन देण्याचे अनेक प्रयत्न केले जातात. शेती किफायतशीर होण्याचे मार्ग सुचविले जातात. परंतु या प्रयत्नांना गती मिळत नाहीए. अशी प्रतिकुल परिस्थिती असताना साखरी बुद्रुक खुर्द मधील कुणबी एकता सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक शेतीचा विचार सर्वांसमोर ठेवला. संघटनेची मुंबई आणि गाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन या विचाराला अभियानाचे स्वरुप दिले. Social Farming Activities in Sakhri Khurd Village

पावसाळा सुरु होण्यापूर्वी  साखरी बुद्रुक खुर्दमधील ग्रामस्थांनी अंकुर 101 या जातीचे 15 किलो भात बियाणे शेतात रुजत घातले. भात रोप लावणीसाठी तयार झाल्यावर 21 जुलैचा रविवार भातलावणीसाठी निश्चित करण्यात आला. रविवारी कुणबी एकता सामाजिक संघटनेचे मुंबई शाखेचे अध्यक्ष अनंत सुवरे यांच्यासह चाकरमानी गावाला आले. ग्रामीण अध्यक्ष सुभाष शितप, सचिव सुनील वरेकर यांच्यासह ग्रामस्थांनी लावणी अभियानाचे नियोजन केले. यामध्ये रोप काढणे, रोप लावणे, नांगरणी याबरोबरच शेतावर आणायचा चहा, दुपारचे भोजन अशा बारीकसारीक गोष्टींचा समावेश होता. Social Farming Activities in Sakhri Khurd Village

Social Farming Activities in Sakhri Khurd Village

रविवारी सकाळी 80 ते 85 महिला पुरुष शेतात दाखल झाले. रोप काढुन त्याच्या मुठी बांधण्यात आल्या. ज्या शेतात लावणी करायची तेथे नांगरणी सुरु झाली. रोपांच्या मुठी लावणी योग्य शेतात महिलांपर्यंत पोचु लागल्या. सर्वांचा उत्साह वाढविण्यासाठी ज्येष्ठ मंडळी लावणीगीते सांगत होती. अशा उत्साहाच्या वातावरणात दिवसभरात दिड एकर क्षेत्रावरील लावणी पूर्ण झाली. सामाजिक शेतीच्या या उपक्रमामध्ये उपसरपंच राजु पवार, ग्रामसेवक महेंद भुवड, ग्रामपंचायत सदस्य समीर पेडणेकर, चंद्रकांत म्हसकर, मारुती मोहिते, रमेश पवार, दिपक पवार, पोलीस पाटील अमित पवार, दिगंबर हळदणकर  हे देखील उपस्थित होते. Social Farming Activities in Sakhri Khurd Village

Social Farming Activities in Sakhri Khurd Village
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSocial Farming Activities in Sakhri Khurd VillageUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet50
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.