• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ति.कुणबी समाज विद्यार्थी गुणगौरव व समाजप्रबोधन कार्यक्रम

by Guhagar News
August 5, 2024
in Ratnagiri
195 2
3
Social awareness program at Sakharpa

साखरपा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. माधव अंकलगे. सोबत सिताराम जोशी ॲड. संदिप ढवळ, प्रकाश मांडवकर,संजय शितप

383
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 05 : साखरपा पंचक्रोशीतील तिल्लोरी कुणबी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व समाज प्रबोधन सोहळा रविवार साखरपा येथील लाड सभागृहात उत्साहात झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून माधव अंकलगे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअर, मेडिकल, आयटीआय यासह विविध क्षेत्रातील करिअर मार्गदर्शन केले. Social awareness program at Sakharpa

त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले तर कोणतेही क्षेत्र अवघड नाही मात्र विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने परिश्रम घेतले तर यश दूर नाही असेही मार्गदर्शन करताना सांगितले. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील सुमारे २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गुलाबपुष्प आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Social awareness program at Sakharpa

तिल्लोरी कुणबी समाज साखरपा पंचक्रोशी या संस्थेचे अध्यक्ष सिताराम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट, सर्वोदय छात्रालय (रत्नागिरी) अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. संदिप ढवळ, राजापूर कुणबी पतसंस्थाचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते संजय शितप, मुर्शी गावचे माजी सरपंच अमोल लाड, हरीभाऊ धुमक, दत्ता घुमे आदी मान्यवर उपस्थित होते. Social awareness program at Sakharpa

या कार्यक्रमात ॲड. संदिप ढवळ यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. तसेच संविधानाचे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्व आणि संविधानाचे वाचन प्रत्येक घराघरात झाले पाहिजे, असे सांगितले. प्रकाश मांडवकर यांनी राजापूर कुणबी पतसंस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे पदाधिकारी प्रमोद जायगडे, बापू ढवळ यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत घागरे, प्रास्ताविक रामचंद्र घाणेकर यांनी केले. जाधव गुरूजी यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश ढवळ, शेलार गुरूजी, रोहिदास मांडवकर, रविंद्र जायगडे, संदिप जोयशी, सुनील शिवगण, पांडुरंग गोरूले गुरुजी, बाईंग गुरुजी, गणपत भायजे आदींनी परिश्रम घेतले. Social awareness program at Sakharpa

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSocial awareness program at SakharpaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share153SendTweet96
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.