• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रात्रीच्या प्रारंभी आकाशात चार ग्रहांचे दर्शन !

by Guhagar News
January 31, 2025
in Guhagar
302 3
0
Sighting of four planets in the sky
594
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ता. 31 :  सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री.दा.कृ.सोमण म्हणाले की, रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात शुक्र-शनी दर्शन देतील. गुरू ग्रह रोहिणी नक्षत्रात मध्यआकाशात दिसेल तर पूर्व आकाशात पुनर्वसू नक्षत्रात लालसर रंगात मंगळ ग्रह दर्शन देईल. हे चार ग्रह साध्या डोळ्यानी सर्वांना पुढील काही दिवस रोज पाहता येतील. युरेनस आणि नेपच्यून साध्या डोळ्यानी दिसणार नाहीत. Sighting of four planets in the sky

Big boost to Maharashtra's development

खगोलप्रेमींसाठी चार ग्रह एकाचवेळी दिसण्याची ही पर्वणी आहे. तुमच्याजवळ जर दुर्बीण असेल तर शुक्राच्या कला, शनीची वलये आणि गुरू ग्रहाच्या पंचाण्णव चंद्रांपैकी चार चंद्र दुर्बीणीतून निरिक्षण करता येतील. सध्या अनेक शाळांतून आणि खगोल संस्थांमधून हे ग्रह दाखविले जात आहेत. त्यामुळे सर्व खगोलप्रेमी मोठ्या उत्साहात आकाश निरिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत. Sighting of four planets in the sky

 सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात शनिवार 1 फेब्रुवारी रोजी चंद्र-शनी युती दिसेल. रविवार 2 फेब्रुवारी रोजी चंद्र-शुक्र युती दिसेल. सोमवार  10 फेब्रुवारी रोजी चंद्र-मंगळ युती दिसेल, असे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या पंचांगकर्ते सोमण यांचे व्याख्यान श्री. दा कृ सोमण हे वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात 8 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 4:00 वाजता त्यांचे व्याख्यान आहे. Sighting of four planets in the sky

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSighting of four planets in the skyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share238SendTweet149
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.