गुहागर, ता. 09 : तालुक्यातील आरे येथील श्री धारदेवी उत्सव देवकर परिवार यांच्या वतीने विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सकाळी श्री धारदेवीचे विधिवत पूजन करण्यात आले. श्री धारदेवीच्या दर्शनासाठी उपस्थित शेकडो भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला. Shri Dhardevi Utsav at Guhagar Aare
यावेळी परिसरातील अनेक भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये देवकर भजन मंडळ, बुवा परेश देवकर, बुवा सदानंद देवकर, श्री जांभळादेवी प्रासादिक भजन मंडळ बाग, बुवा अरुण बागकर, बुवा अनंत धर्माधिकारी, श्री कलावती आई भजन मंडळ गुहागर वरचा पाट, आदर्श भजन मंडळ आरे बुवा अमोल देवकर या भजन मंडळीचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी देवकर कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी मेहनत घेतली. Shri Dhardevi Utsav at Guhagar Aare